💓🇮🇳खरा शिव भक्त -शिवजयंती स्पेशल
*छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा...!💐💐💐💐💐* प्रत्यक्ष शिवरायांचे आदर्श,त्यांचे विचार आत्मसात करणं महत्वाचं..बाकी गाजावाजा जल्लोष तर बाय प्रॉडक्ट चालतोच...वर्तवणुकी तुन महाराज दिसले म्हणजे शिवभक्ती सार्थकी लागली समजायची...छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धी आणि जबरदस्त नियोजनाच्या जोरावर आपल्या मावळ्यांना एकत्र करून उभारलेल्या स्वराज्यात कोणत्याही वाईट गोष्टीला परवानगी नव्हती.मग ते व्यसन असो वा लेकी बाळी चा छळ..असामान्य नेतृत्वक्षमता, नियमांची काटेकोर अंमलबजावणी, भेदभाव विसरून सर्वांना जोडून ठेवण्याची कसब, चार पावलं पुढचा विचार करून नियोजन करण्याचा दूरदृष्टी दृष्टिकोन.., जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर यातील निदान एक तरी गोष्ट नीट जमवून बघण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.महाराजांनी व्यसनाला कडकडीत विरोध केला होता. तुमच्या पैकी किती खरे शिवभक्त व्यसनापासून दूर आहेत? किती शिवभक्त माया बहिणींना इज्जत देतात? किती शिवभक्त वयोवृध्दांचा आदर करतात? किती शिवभक्त महाराजांच्या लुक सोबतच त्यांच्या आदर्शानाही जीवनात उतवरतात?मी कधी ...