Posts

Showing posts from September, 2019

अनुभव आहे हा आणि खरं आहे

अचानकच सुचलय...     आपल्याकडे ना समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी समस्यांचा प्रचार जास्त केला जातो.बघा ना, साधा गल्लीतला लाईट जरी गेला तर नुसता गोंगाट सुरू होतो. अरे लाईट गेला अरे लाईट गेला. तेवढं करण्यापेक्षा संबंधित कर्मचाऱ्यांना कळवून देणं त्यांना शक्य होत नाही...म्हणजे आम्ही फक्त प्रत्येक गोष्टीत चुकाच शोधत असतो. समस्यांचा ढीग साठवला जातो पण उपाय कुणास सुचवत नाही...गावात पारावर बसलेल्या लोकांजवळ उभे राहून बघा. रस्त्यावर खड्डे आहेत, सरकार चांगलं नाही, याने अमुक केलं त्याने टमुक केलं, ही अशी तो तसा, अरे ती अमक्याची पोरगी टमक्याच्या पोरासोबत पळून गेली असं कितीतरी गप्पा ऐकायला भेटतातच..आपणही त्यातलेच!... ‌     चार जण एकत्र उभे असतात तेव्हा जो पाचवा हजर नसतो त्याची बुराई करताना दिसतात...आपण मागे पडलो याच्यापेक्षा दुसऱ्याचं पोरगं पुढं जातंय यामुळं लोकांचं पोट दुखायला लागतं...एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांपैकी जो नापास होतो तो शाळेलाच नावं ठेवतो. आणि त्याच शाळेत ज्याचा पहिला नंबर येतो तो शाळेला चांगलं म्हणतो...एकाच ठिकाणी काम करणाऱ्या मित्रांपैकी एक घरी पळून जातो आण...