अनुभव आहे हा आणि खरं आहे
अचानकच सुचलय...
आपल्याकडे ना समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी समस्यांचा प्रचार जास्त केला जातो.बघा ना, साधा गल्लीतला लाईट जरी गेला तर नुसता गोंगाट सुरू होतो. अरे लाईट गेला अरे लाईट गेला. तेवढं करण्यापेक्षा संबंधित कर्मचाऱ्यांना कळवून देणं त्यांना शक्य होत नाही...म्हणजे आम्ही फक्त प्रत्येक गोष्टीत चुकाच शोधत असतो. समस्यांचा ढीग साठवला जातो पण उपाय कुणास सुचवत नाही...गावात पारावर बसलेल्या लोकांजवळ उभे राहून बघा. रस्त्यावर खड्डे आहेत, सरकार चांगलं नाही, याने अमुक केलं त्याने टमुक केलं, ही अशी तो तसा, अरे ती अमक्याची पोरगी टमक्याच्या पोरासोबत पळून गेली असं कितीतरी गप्पा ऐकायला भेटतातच..आपणही त्यातलेच!...
चार जण एकत्र उभे असतात तेव्हा जो पाचवा हजर नसतो त्याची बुराई करताना दिसतात...आपण मागे पडलो याच्यापेक्षा दुसऱ्याचं पोरगं पुढं जातंय यामुळं लोकांचं पोट दुखायला लागतं...एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांपैकी जो नापास होतो तो शाळेलाच नावं ठेवतो. आणि त्याच शाळेत ज्याचा पहिला नंबर येतो तो शाळेला चांगलं म्हणतो...एकाच ठिकाणी काम करणाऱ्या मित्रांपैकी एक घरी पळून जातो आणि सगळ्या गल्लीत ,सगळ्या गावात त्या ठिकाणाची बदनामी करतो. आणि दुसरा मित्र अजून मेहनत करतो,प्रमोशन घेतो आणि पैसे कमवितो..सांगा मग, आपल्या अपयशाची कारणं आपण स्वतःच असतो पण नावं मात्र दुसऱ्या व्यक्तीला ,ठिकाणाला आणि वातावरणाला ठेवतो... आता ह्याच अपयशी माणसांना आम्ही आणि आमचे घरचे सल्ले मागतो. मग त्यांना जे सांगायचं ते तर त्यांनी आधीच ठरवलेलं असतं... नको रे ,तिकडं नको जाऊ ,मी अनुभव घेतलाय ते काम चांगलं नाही ,तिथं फसवलं जातं . मग काय असल्या लोकांमुळे च तर चांगली माणसं चांगल्या कामापासून कायमचे दुरावले जातात..त्यांचं भविष्य ते दुसऱ्यांच्या सल्ल्यावरून निश्चित करणे पसंद करतात...ज्या क्षेत्रात आपल्याला पाऊल ठेवायचं आहे ,त्याच क्षेत्रात अपयशी झालेल्या लोकांचा जर तुम्ही सल्ला मागू राहिले ,तर तुम्हाला खरंच ते चांगलं सांगतील का? ज्यांनी कधी मनापासून मेहनत केली नाही ,त्यामुळेच त्यांना अपयश आलेलं असतं ...हल्ली सल्ले फुकट भेटायला लागले आहेत.विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान हे त्याच क्षेत्रातील यशस्वी माणसाला आदर्श मानून सल्ला घेतला तर नक्कीच योग्य सल्ला भेटू शकेल...काही गोष्टीचा सल्ला घेतल्यापेक्षा डायरेक्ट प्रत्यक्ष तिथं जाऊन ,सगळं पाहुन जर तुम्ही सत्य शोधू लागाल तरच तुमच्या प्रगतीचे दरवाजे आणि खिडक्या आपोआप खुल्या होतील..आणि जर तुम्ही सल्ल्यांच्या हिशोबावर तुमचे निर्णय घेत आहात तर सावधान, येणारा काळ हा तुम्हाला यश मिळवून देईलच याची ग्यारंटी नाही..
(अनुभव)
GKSHELKE
9503749967

Comments
Post a Comment