Posts

Showing posts from May, 2020

म्हाताऱ्याचं दुःखं...

#म्हाताऱ्याचं_दुःख.. - ग.का.शेळके       तरुणपणी मी खूप कामं केली.अंगाला नेहमी काम करत राहण्याची सवय झाली होती.घरी खूप जमीन होती,परंतु काही कारणास्तव वाडवडिलांनी विकून टाकली.मी खूप लहान असतानाच माझं लग्न लावलं गेलं.त्यावेळेस संसार काय असतो हे कुणाला माहीत होतं? पण सुंदर मनाची जोडीदारीण भेटली आणि आयुष्य अजून सुंदर बनलं.बघता बघता दोन मुलं आणि एक सालस मुलगी झाली. त्यांच्यासाठी आयुष्य जगत आलो. दुर्दैवाने पत्नीच्या आयुष्यासाठी तिच्या आजारपणात इलाजासाठी  जमीन विकावी लागली.पोरांच्या आईच्या जिवापेक्षा जमीन काही जास्त नाही असं वाटलं.वर्षामागे वर्षे लोटली आणि पोरं जवानीत  अली.पण मोठा मुलगा कमी वयातच व्यसनाच्या मागे लागला.वाईट संगतीत राहून शिवीगाळ करणं शिकला.जबाबदारी ची त्याला जाणीव वाटेनाशी झाली.या परिस्थितीत लोकांचं ऐकलं, पोराचं लग्न लावून द्या तरच ते सुधारेल काहीतरी.. भोळ्या भाबड्या आम्ही मायबापानी त्याचं लगीन लावून दिलं.पण तरी त्याची वागणूक बदलत नव्हती.दारू च्या पायी बायोकोलाही तो त्रास देऊ लागला. जिणं मुश्किल करून टाकलं. म्हणून काळजावर दगड ठेवून त्याला बायोकोसह घराबाहे...