MY LIFE STYLE
माझा इयत्ता 7-8 वी पासून शाळेत आणि त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पहिला नंबर यायचा.पण लोकांना आणि माझ्या मित्रांनाही गैरसमज की हा खूप हुशार आहे आणि याला खूप काही येतं.पण तसं काही नव्हतं.खरं तर मला वाचनाची प्रचंड आवड होती.नवीन इयत्तेला प्रवेश करण्यापूर्वी च मी पुस्तके विकत घ्यायचो आणि भराभर उत्सुकतेने वाचून काढायचो.मराठी ची सर्व धडे,कविता आणि सुभाषिते मला खूप आवडायचे म्हणून ते माझ्या लवकर लक्षात रहायचे.त्याचप्रमाणे बाकी विषयांवर ही मी आवडीने लक्ष द्यायचो. जिथं आवड असते तिथं जास्त अभ्यासाची आवश्यकता भासत नाही.म्हणून मी परीक्षेत मनापासून माझ्या स्वतःच्या शब्दांत उत्तरे लिहायचो. त्यामुळं दर वर्षी चांगले मार्क्स मिळायचे आणि नकळतपणे प्रथम क्रमांक ही मिळायचा.पण मी कधीही सर्वात जास्त गुण मिळावेत,आणि प्रथम क्रमांक मिळावा या हेतूने शिक्षण घेतलंच नाही.ते तर आवडीमुळे मला चांगलं लिहायची सवय लागली होती.इंग्रजी आणि मराठी या दोन विषयात मी जास्त रस घ्यायचो त्यामुळेच त्यात जास्त मार्क्स भेटले की टक्केही जास्त पडायचे.मला नेहमी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायची आवड होती.मी कधीच स्वतः ला जास्त हुशार स...