MY LIFE STYLE

माझा इयत्ता 7-8 वी पासून  शाळेत आणि त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पहिला नंबर यायचा.पण लोकांना आणि माझ्या मित्रांनाही गैरसमज की हा खूप हुशार आहे आणि याला खूप काही येतं.पण तसं काही नव्हतं.खरं तर मला वाचनाची प्रचंड आवड होती.नवीन इयत्तेला प्रवेश करण्यापूर्वी च मी पुस्तके विकत घ्यायचो आणि भराभर उत्सुकतेने वाचून काढायचो.मराठी ची सर्व धडे,कविता आणि सुभाषिते मला खूप आवडायचे म्हणून ते माझ्या लवकर लक्षात रहायचे.त्याचप्रमाणे बाकी विषयांवर ही मी आवडीने लक्ष द्यायचो. जिथं आवड असते तिथं जास्त अभ्यासाची आवश्यकता भासत नाही.म्हणून मी परीक्षेत मनापासून माझ्या स्वतःच्या शब्दांत उत्तरे लिहायचो. त्यामुळं दर वर्षी चांगले मार्क्स मिळायचे आणि नकळतपणे प्रथम क्रमांक ही मिळायचा.पण मी कधीही सर्वात जास्त गुण मिळावेत,आणि प्रथम क्रमांक मिळावा या हेतूने शिक्षण घेतलंच नाही.ते तर आवडीमुळे मला चांगलं लिहायची सवय लागली होती.इंग्रजी आणि मराठी या दोन विषयात मी जास्त रस घ्यायचो त्यामुळेच त्यात जास्त मार्क्स भेटले की टक्केही जास्त पडायचे.मला नेहमी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायची आवड होती.मी कधीच स्वतः ला जास्त हुशार समजलं नाही. माझ्या लाईफ मध्ये खूपच भारी पोस्ट मिळावी अशीही माझी इच्छा किंवा अपेक्षा नाही. एखाद्या साध्या ठिकाणी ही छोटीशी नोकरी मिळाली तरी मी आनंदाने, समाधानाने जगू शकतो याची मला खात्री आहे. मला जास्त मोह माया मध्ये अडकणे बिलकुल आवडत नाही.कोणी माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तो विश्वास कायम ठेवण्यासाठी जितकं होईल तितकं करतो.पण कोणी माझ्याकडून जास्तच अपेक्षा ठेवत असेल तर ते मला बिलकुल आवडत नाही.मी एक साधा,गरीब घरचा मुलगा आहे ज्याला जे भेटेल त्यात समाधान मानणं महत्वाचं वाटतं.भारी कपडे,बाईक, किंवा उंचीची वस्त्रे  यांचा मोह नाही.लोक माझ्याकडे खूप अपेक्षा ठेवून राहतात जसे की याने कलेक्टर झालं पाहिजे, मोठ्या पदाची नोकरी मिळवली पाहिजे.पण मला माहित आहे की एम पी एस सी किंवा इतर स्पर्धा परीक्षा ची तयारी करण्यासाठी माझ्याकडे तेवढी बौद्धिक आणि मानसिक पातळी नाहीये.पहिला नंबर येणारा हुशार किंवा बुद्धिमान असेलच असे नाही, निदान माझ्या बाबतीत तरी नाही. पुढं काय करायचं , याचंही मला काही माहीत नाही.थोडक्यात माझ्या जीवनाला ध्येय नाही असं म्हटलं तरी चालेल.कोणाच्या पाठीमागे कोणाचीही चुगली किंवा कळ करणे मला अजिबात आवडत नाही.मी कधी कुणाबद्दल वाईट विचार करत नाही. जे आहे ते तोंडावर बोलायला मला आवडतं.मी कधीच माझ्या मनात जास्त विचार थांबू देत नाही, आई किंवा बाबा किंवा जवळच्या फ्रेंड जवळ सगळं शेअर करतो.माझ्याकडून नकळतही जर कुणाचं वाईट झालं तर त्याबद्दल नेहमी मी गिल्टी फील करतो.मला जास्त गर्दीमध्ये राहणं जमत नाही.मी जास्तीत जास्त वेळ स्वतः शी बोलण्यात घालवतो.जगात मी सर्वांत जास्त प्रेम स्वतः वर च करतो.म्हणून मी व्यसन किंवा शारीरिक हानी करणाऱ्या गोष्टींच्या बळी पडत नाही.पण मी स्वार्थी मात्र नाही.मी जिथं जाईन तिथं चांगल्याच गोष्टी घडल्या पाहिजेत असं मला नेहमी वाटतं.मला अहंकार आवडत नाही.पण मी स्वतः ला कुणापेक्षा कमीही समजत नाही.मी जसा आहे ,तसा बेस्ट आहे.माझ्या आई वडिलांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सोबत असलो पाहिजे ,त्यांना आनंद देत  जगता आलं पाहिजे म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे.मला स्वतःला बंधनात ठेवलेलं आवडत नाही.आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे हे मला कळून चुकलं आहे. मला माहित आहे की मी काही मोठी हस्ती नाही, पण मी माझ्यासाठी हिरो आहे. बाकी लोक माझ्याबद्दल काय विचार करतील किंवा काय म्हणतील याचंही मला काही घेणं देणं वाटत नाही. मला सगळ्यांचं चांगलं व्हावं असं वाटतं.उगाच मी कुणालाही अर्धवट माहिती वरून दोष देत बसत नाही.एका प्रसंगावरून कुणाचं ही कॅरेक्टर जज करणं मला तरी आवडत नाही.माझ्याशी कोणी प्रेमाने, शांती ने बोललं तर मीही त्याला तसंच बोलतो.मग बोलणाऱ्याच्या मनात किती पाप आहे याच्याशी मला काही घेणं नसतं.
    कधी कधी मी इमोशन्स मध्ये अडकतो पण लगेच थोड्या वेळात मी प्रॅक्टिकल होऊन निर्णय घेण्यास महत्व देतो.सध्या माझं वय 24 आहे आणि माझ्या घरच्यांना माझ्या नोकरी विषयी किंवा लग्नाविषयी चिंता वाटत असेल पण मी माझ्या कडून जेव्हढे प्रयत्न होतील तेवढे करत आहे.आयुष्यात जर समाधान कारक काम भेटलं नाही तर मी लग्नच करणार नाही हे माझं ठाम आहे.जर भेटलं तर मग एखादी साधी ,सरळ मुलगी बघून  तिच्या आयुष्यात तिच्या आनंदाचं आणि सुखाचं कारण बनण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन हेही ठाम आहे.मला इतरांच्या भानगडीत नाक खुपसायची अजिबात हौस नाही.कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देणं मी अतिशय मुर्खपणा समजतो.मला चुकीच्या गोष्टींचा खूप राग येतो पण जेव्हा माझं चुकतं तेव्हा मी स्वतःला शिक्षेसाठी तयार ठेवतो.माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणी जास्त हस्तक्षेप करणं मला अजिबात सहन होत नाही. कारण मी स्वतः ही तसा वागत नाही. मला जे झेपतं ते काम मी मनापासून करतो.जे काम एकदा समजलं त्याला अजून सोपं कसं बनवता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो.कामाच्या ठिकाणी काम करत असतांना तरी मी उगाच मोबाईल काढून काड्या करत नाही. कामाशिवाय मला करमत नाही.पण जेव्हा काम बंद असतं तेव्हा मी सोशल मीडियावर वाचन व मत प्रदर्शन करण्यासाठी तत्पर राहतो. कुणाला त्याच्या भूतकाळात झालेल्या चुकांमुळं वाईट वागणूक देणं मला अजिबात आवडत नाही.बदल हा निसर्गाचा नियम आहे असं मला वाटतं.सर्वांनी आनंदानं जगावं हीच माझी इच्छा असते. ज्याच्याशी माझं पटत नाही ,त्याच्यापासून मी चार हात लांबच राहतो.

   ग.का.शेळके

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!