जवळ पैसा असला तर...
#जवळ_पैसा_असला_तर ... माणूस कायपण करू शकतो... नवीन कपडे,चपला बूट घेऊन आत्मविश्वासानं बोलू शकतो... शिक्षण, नोकरी गिकरी अन छोकरी सगळं काही मिळवू शकतो... कोणालाही नीचा दाखवू शकतो.. त्याच्या पोरांना कामं गिमं न करताही त्यांच्या म्हत्वाकांक्षा,काहीतरी वेगळं करण्याची इच्छा, नाव मिळवण्याची इच्छा अन बरंच काही पूर्ण करता येतं.. पैसा असला तर इकडं तिकडं कामं न करता एखादी रूम करून म्हणा किंवा बाईक घेऊन म्हणा mpsc वगैरे च्या शिकवण्या घेता येतात... जवळ पैसा असल्यावर चार चौघांच्या कामीही पडता येतं... आपल्या पोरांना मोठया मोठ्या शहरात शिकायला पाठवता येतं... गरज पडली तर पैसे भरून पोरांना नोकरी ला लावता येतं... पैसा असला की दीड महिन्याचं कागदपत्र दोन दिवसातच बोलावून घेता येतं... पैसा असला मुलांना तर मोठया थाटात ,हिंमतीने कुठंही फिरायला जाता येतं... आता तर लग्न करायचं म्हटलं तर रंगाचीआणि प्रेम होण्याची काही कारण नाही फक्त पैसा असेल तर चटकन सोयरीक गियरीक करता येते..काही ताण राहत नाही... पैसा असला तर शेती विकत घेऊन बागबागायत फुलवता येते, संपत्तीत अजून भर टाकता येते.. पैसा असला तर कुणालाह...