HAPPY BIRTHDAY VAIBHAV

WISH
  YOU
MANY MANY
HAPPY RETURNS OF THE DAY
MY YOUNGER BRO....💐💐🙏🏽🇮🇳😎

माझ्या प्रिय भावा,
    तू माझ्यापेक्षा अडीच वर्षाने लहान जरी असला तरी कधी मला तसं वाटू दिलं नाहीस.बाकीचे लहान भाऊ त्यांच्या मोठ्या भावाला नेहमी अभ्यासात म्हणा,इतर गोष्टींत म्हणा विचारतात पण तू मला तेव्हढी पण तकलीफ देऊ केली नाहीस.मी नेहमी माझं मन तुला मेसेज ने व्यक्त करत राहीलो पण तू कधी तुझे प्रॉब्लेम्स मला सांगून मला टेन्शन दिलंच नाहीस.मी फक्त शिक्षण घेत राहिलो पण तू शिक्षण सोडून कामाच्या मागे लागलास आणि स्वतः ची एक  चांगला वेल्डिंग कामगार म्हणून मित्रांमध्ये ख्याती मिळवलीस.तुझी जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच .तुझी सुंदर भारी भक्कम शरीरयष्टी तुझ्या निरंतर व्यायाम आणि कसरतीचे उत्तम फळ आहे.तुझ्यासारखा संयम आणि कामामध्ये एकाग्रता मी कधीच पहिली नाही.तू एक उत्तम माणूस आहेस.नेहमी दुसऱ्यासाठी मदतीला विना तक्रार तयार असतोस.तुझा तो  दिलदार स्वभाव आणि काय तो रुबाब!.. तुझा तो कमी वयातील व्यावहारीक जीवनाचा अनुभवी अभ्यास मला अजून भावतो. एक मोठा भाऊ  म्हणून मी कधीच तुझ्यावर हक्क दाखवू शकत नाही कारण तू तेवढी गरज भासुच दिली नाहीस.माझ्यापेक्षा लहान असूनही माझ्यापेक्षा जास्त जबाबदार तू आहेस आणि त्याचा मलाही अभिमान आहे.पण (ज्याची त्याची स्वतः ची लाईफ स्टाईल असते.)असो,  आज तुझा 22 वा वाढदिवस . तुझे मित्र आणि तू नेहमीप्रमाणे आजही सेलिब्रेट करणारच.माझीही नेहमी इच्छा होते की आपण आपल्या लहान भावाच्या गळ्यात पडावं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा द्याव्यात, पण आपल्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात असलेल्या भिन्नते मुळे ते आता शक्य वाटत नाही...तू मित्रांच्या दुनियेचा राजा आहेस कारण तू बिकट प्रसंगात तुझ्या मित्रांसाठी हजर असतोस.तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो.आणखी तुझी कधी नव्हत उगवणारी स्माईल जीची मी तुझ्या चेहऱ्यावर येण्याची मी नेहमी वाट बघतो, तुझं ते गल्लीतल्या पोरांना उलटं उचलून त्यांच्या खोड्या करणं, तुझी स्टायलिश हेअर स्टाईल, तुझं ते गजब चं ड्रेसिंग सेन्स ... त्या सगळ्यांचा मी फॅन आहे.पण दोन्ही भाऊ सारखेच राहिले तर मजा नाय न येणार म्हणून हम हम है और तुम तुम हो जानी... तुला नेहमीच तुझ्या सर्व अडचणींना सामोरे जाण्यासाठी ईश्वर शक्ती देवो आणि तुझ्या कामातील उत्साह असाच जबरदस्त राहो आणि तुझी दोस्तांच्या दुनियेतली मेहफिल  अगदी अजून  भारी बनत राहो असं मला मनापासून वाटतं.मी कधी बोलून नाय दाखवलं पण माझं तुझ्यावर लय प्रेम आहे भावा...असा एक पण दिवस नसेल जेव्हा मला तुझ्याशी मोकळं बोलण्याची इच्छा झाली नसेल... आपल्यात बऱ्याच गोष्टींबाबत फरक आहे आणि तो असलाच पा
हिजे.तू माझा मोठा भाऊ म्हणून आदर करावा असं अद्याप तरी काही केलं असेल असं मला वाटत नाही  ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे.आणि तू आदर द्यावास ही मला अपेक्षाही नाही.बस तू तुझ्या लाईफ मध्ये हमेशा खुश राहिला पाहिजे,तुझी प्रत्येक कामात भरभराट झाली पाहिजे आणि माझ्यापेक्षा ही तुला जास्त भेटलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे.. बस थोडं काम करतांना शरीराला जपत जा,काही प्रॉब्लेम असला तर निदान शेअर करत जा हीच अपेक्षा..मला माहित आहे, तुला असं सोशल मीडियावर लिहिलेलं जास्त भावत नाही..बस तुझा बर्थड्डे हेच कारण भेटते तुला असं बोलायला...पण मला मन मोकळं करण्यासाठी याव्यतिरिक्त दुसरं कोणी बेस्ट वाटत नाही म्हणून मी असाच आहे. असो काही चुकलं असेल तर दादा ला ( कधी म्हटलं नाहीस तरी) माफ करशील. ..
पुन्हा एकदा एक मित्र म्हणून तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
     तुझा तो भाऊ,

  • (आणि माझ्या स्वप्नातला तुझा दादा).

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!