जवळ पैसा असला तर...
#जवळ_पैसा_असला_तर ...
माणूस कायपण करू शकतो...
नवीन कपडे,चपला बूट घेऊन आत्मविश्वासानं बोलू शकतो...
शिक्षण, नोकरी गिकरी अन छोकरी सगळं काही मिळवू शकतो...
कोणालाही नीचा दाखवू शकतो..
त्याच्या पोरांना कामं गिमं न करताही त्यांच्या म्हत्वाकांक्षा,काहीतरी वेगळं करण्याची इच्छा, नाव मिळवण्याची इच्छा अन बरंच काही पूर्ण करता येतं..
पैसा असला तर इकडं तिकडं कामं न करता एखादी रूम करून म्हणा किंवा बाईक घेऊन म्हणा mpsc वगैरे च्या शिकवण्या घेता येतात...
जवळ पैसा असल्यावर चार चौघांच्या कामीही पडता येतं...
आपल्या पोरांना मोठया मोठ्या शहरात शिकायला पाठवता येतं...
गरज पडली तर पैसे भरून पोरांना नोकरी ला लावता येतं...
पैसा असला की दीड महिन्याचं कागदपत्र दोन दिवसातच बोलावून घेता येतं...
पैसा असला मुलांना तर मोठया थाटात ,हिंमतीने कुठंही फिरायला जाता येतं...
आता तर लग्न करायचं म्हटलं तर रंगाचीआणि प्रेम होण्याची काही कारण नाही फक्त पैसा असेल तर चटकन सोयरीक गियरीक करता येते..काही ताण राहत नाही...
पैसा असला तर शेती विकत घेऊन बागबागायत फुलवता येते, संपत्तीत अजून भर टाकता येते..
पैसा असला तर कुणालाही लवकर जामीन मिळवून देता येते...
मुलांच्या भविष्यासाठी बँक बॅलन्स राखून ठेवता येते...
पुरेसा पैसा असला तर मुलांना मस्त अनेक ग्रंथ कादंबऱ्या वाचून ग्यानाच्या कक्षा वाढविण्यासाठी वेळ भेटतो...
पैसा असला तर खूप साऱ्या अडचणी दूर होतात...
आजकालचे आम्हाला हाव असलेलं प्रेमप्रकरण जास्त काळ टिकवायचं म्हटलं तर पैसा पाहिजे...
पैसा आला की माय बापाना मजुरी करायची गरज राहत नाही आणि त्यांना पुढचं आयुष्य आरामात घालवता येतं...
पैसा असला तर मोबाईल, संगणक तसेच बाकी तंत्रे मिळवून महत्वाचे कामं पार पाडता येतात...
पैश्यावाला जर मोठया दिलाचा असला तर गावाच्या प्रगतीत मोठा हातभार लागू शकतो...
पैशामुळे आयुष्य भरभरून जगता येतं...
पैशांच्याच भरवशावर कुणालाही धमकावता येतं आणि कुणालाही संकटातून तारता येतं...
खूप पैसा असणारा व्यक्ती जर बुद्धिमान आणि दयावन असला तर तो काय काय करू शकतो याचा मी अंदाज नाही काढू शकत...
पण मित्रांनो,
हा पैसा काही ढगातून पडत नाही किंवा झाडाला लागत नाही...त्याला मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांना कधीकाळी मोल मजुरी करावी लागली .घाम गाळावा लागला.. .त्यांच्या कष्टाचं चीज होऊन मग त्यांची प्रगती होऊन त्यांच्या मुलांना म्हणजेच आपल्या बापजाद्याना तुलनेने कमी कष्ट करावे लागले असतील...आणि त्याचं फळ म्हणून त्यांची प्रगती होऊन आपलं भवितव्य घडत असतं असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही...हो काहीजण अपवाद असतील कदाचित...पण मित्रांनो हे तर मानांवच लागल की पैश्याशिवाय सामान्य तसेच असामान्य माणसाला काहीही करता येत नाही...कुठपन जायचं म्हटलं तर खिशात पैसे लागतात.जवळ गाडी असेल तर गाडीत पेट्रोलपन लागतं अन पेट्रोल साठीपण पैसाच लागतो...अंगातल्या कपड्यांपासून ते अंतिम संस्कारापर्यंत सगळ्या कामांसाठी पैसा लागतो...
निवडणुका जिंकायला पैसा किती महतवाचा आहे हे तर तुम्हाला माहीत असेलच...काहीही करायचं म्हटलं तर फोन लावायला फोनमध्ये बॅलन्स लागतंच!बॅलन्स नाही तर फोन काय कामाचा?...मी तर म्हणतो दुनियेत सगळ्यात मोठा गुरू जर असेल तर पैसा !..
पैसाच सर्वकाही नसतो ,या दुनियेत ,माणुसकी ,प्रेम ,माया ममता ,भावना, मोठेपणा ,कर्तबगारी, लोकसेवा, मनाचं समाधान अन बरंच काही पैशापेक्षाही मोलाचं असतं...हे मत फक्त मनातच राहतं घुसमटून...काही अपवाद व्यक्ती घडतात जे हे मत सिद्ध करतात पण बाकी सगळे च्या सगळे पैशाचे गुलाम आहेत हे कलियुगाचं त्रिकालबाधित सत्यच !.....भिकाऱ्या पासून श्रीमंतापर्यंत, पुजाऱ्यापासून भक्तांपर्यंत अख्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत " पैसा बोलता है भाई लोग, पैसा बोलता है..😢😢." ह्या पैशाच्या तणावपायी कितीतरी त्रस्त तरुण हताश होऊन दारू ,तंबाखू, गुटखा, अन कितीतरी व्यसनं करू लागतात आणि त्यांचा परिणाम अवघ्या कुटुंबव्यवस्थेवर त्यातून समाजव्यवस्थेवर अन त्यातून कुठं न कुठं दुसऱ्या एखादया व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो...पैसाच सर्वकाही आहे असे मानणारे कुणाचा खून करतानाही मागपुढं बघत नाहीत..
पैशाच्या अभावी चोरी गिरी आणि दहशतगिरी
निर्माण होते आणि मग कितीतरी गुन्हे घडत जातात...पैशासाठी नवऱ्याचा ,बापाचा ,भावाचा कुणाचाही घात या जगात होतांना दिसतो...भावभावना चं सोडाहो ,जवळ पैसा नसला तर माणूस बायका पोरांच्या पोटापाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन काय काय करत असेल या विचारानच जीव कासावीस होतो... काय सांगावं आता, ह्या पैशापायी मोठ मोठे घोटाळे होतात.पैसा आल्यावर गरजा वाढतात ,गरजा वाढल्यावर खर्चही वाढतो...चिक्कार पैसा कमावल्यावर सोनाराचं दुकानपन आपल्या घरचंच होतं...
GKSHELKE

Comments
Post a Comment