Real Success

खरे यश कसे? यश म्हणजे फक्त नोकरी ला लागणं , पैसा कमवणे, शेत असणे आणि मोठं घर असणं एवढंच का? समजा मी हे सगळंच मिळवलं , आणि माझ्यात सद्गुण , चांगले वर्तन च नसले तर ते माझं यश ठरेल का? जर माझ्याकडे वरील सर्व गोष्टी असतील तर मुलीच्या घरच्यांना त्यांची मुलगी मला देतांना काही वाटणार नाही बरोबर ना. पण जर माझ्याकडे एवढं सगळं राहून पण माझी वागणूक चांगली नसेल आणि माझ्या मनात स्त्रियांचा आदरच नसेल तर त्यांनी मला त्यांची मुलगी देणं योग्य ठरेल का? आज मी शून्य आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाहीये आणि शेत सुद्धा नाहीये , स्वतःच्या पायावर मी उभा नाही अजून . पण माझ्या मनात चांगले विचार असतील, मुलींची इज्जत असेल, वडीलधाऱ्यांचा आदर असेल, परोपकार मला माहित असेल, लाईफ पार्टनर ला लाईफ टाईम जीव लावण्याची आणि तिच्या छोट्या छोट्या इच्छा व तिचा आत्मसमान जपण्याची क्षमता माझ्यात असेल तर मी यशस्वी नक्कीच राहील हे माझं मत आहे.. तुम्हाला काय वाटते? जेव्हा एक बाप आपल्या मुलींसाठी मुलगा बघतो तेव्हा भौतिक गोष्टींचा च जास्त विचार करतो.पोरगा किती शिकलाय, नोकरीला आहे का, घरी शेत आहे का, घर कसं आहे, पगार किती म...