प्रेम भावना part 1
प्रेम .... !!
प्रेम काय असतं कसं असतं हे सांगणं मोठं गोंधळाचं काम वाटतं मला . कारण प्रेम इतकं व्यापक आहे कि त्याच्यामुळेच जगातील सर्व नाते एका भावनिक बंधनात बांधले गेलेले आहेत . आजच्या तरुण पिढीला जेव्हा प्रेम काय असतं त्याची ग्रेटनेस काय आहे , तेच कळत नसतं तरी त्यांना प्रेम कसं होतं कुणास ठाऊक ... मी शाळेपासून तर कॉलेज पर्यंत च्या माझ्या आयुष्यात भरभरून जीवन जगलो. बऱ्याच वेळा प्रेम हा
शब्द कानी पडला . मग वरून पिक्चर्स वगैरे बघून सुद्धा प्रेम नेमकं काय असतं याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागली . तर शेवटी प्रेम म्हणजे काय असतं ते मला अनुभव घेतल्या नंतर कळलं .... जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात , तेव्हा त्यांच्यात बॉण्डिंग होण्याचं कारण म्हणजे त्यांना हवी असलेली मनासारखी , समजून घेणारी व्यक्ती मिळाली आणि तीच व्यक्ती आपल्याला आनंद देऊ शकते असे त्या दोघांच्याही मनात जेव्हा त्यांचा मेंदू महाशय फिक्स करून टाकतो , तेव्हापासून जी भावनिक , ग्रेट आणि जगातील सर्वात सुंदर आणि आनंददायी गोष्ट हृदयाला साद घालू लागते .. माझ्यामते तिथंच हे प्रेमाचं फुल फुलू लागते . जेव्हा माणसांना एकमेकांना समजून घेणं जमू लागते तेव्हा हि व्यक्ती लाईफ टाइम आपल्याला भेटली पाहिजे , आपल्यापासून कधीच दूर नाही गेली पाहिजे , असं वारंवार मनाला धडधड होत राहते आणि हृदयात प्रचंड भावनिक वादळ वाहू लागतं त्यावेळेस काहीतरी भारी वाटतं असतं , मित्रानो माझ्यामते तेच प्रेम असतं .... जिथं समोरच्याने सुद्धा आपल्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे हि भावना न ठेवता त्याला किंवा तिला कायम आनंदी ठेवण्यासाठी हवं ते मी हवं ते करीन , हवा तो त्याग करीन , असा निर्धार जेव्हा आपलं मन आपोआप करू लागतं ना , तेव्हा समजायचं कि हेच प्रेम आहे ... ! ह्या प्रेमाच्या अनेक बाजू , अनेक पैलू असतात , हे एकाच प्रकारचं नसतं . मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये फक्त गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड सारखंच होत असते असा माझा लहान होतो तेव्हाच मोठा गैरसमज होता , मग समजलं , प्रेमाला मुळात मर्यादाच नसतात .. प्रेम भावा आणि बहिणीच्या नात्यात असतं , आई बाबांच्या काळजीत, त्यांच्या रागामध्ये असतं, काहीवेळा ते व्यक्त होत नाही बस तो भाग वेगळा .. पण आतून मात्र दाटलेलं असतं . रक्ताच्या नात्याच्या बाहेर जाऊन अनोळखी परंतु मनाला सुंदर स्पर्श करून गेलेल्या , माझी नेहमी काळजी घेत माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून माझ्या मनाचा अंदाज लावणाऱ्या त्या मुली ज्या मला दादा , दादू,भाई, करून माझ्या भोवती फुलपाखरा सारख्या गिरक्या घालायच्या आणि मला नेहमी खळखळून हसायला लावायच्या, मला मनापासून घरी चहा ला बोलवायच्या , त्यांचं ते आपुलकी चं वागणं माझ्या साठी तर प्रेमच होतं ... प्रेमाविषयी प्रत्येकाची व्याख्या ,दृष्टी बदलू शकते ,यात काही वाद नाही . एकमेकांशी छान छान बोललं म्हणजे प्रेम झालंच असं नसतं , सुंदर चेहरा बघून तर कोणीपण भाळून जातं , मग का सर्वच सुंदर चेहऱ्यावर प्रेम होत असतं का ?? प्रेम त्याच्या पलीकडे असतं...माझ्यामते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला इतकी आवडू लागते कि तिच्या नुसत्या मेसेज ने किंवा भेटीने आपला दिवसभरचा थकवा,त्रास च नाहीसा होऊन जातो , त्या व्यक्ती बद्दल जे आपल्याला वाटत राहतं त्यालाही आपण प्रेम म्हणू शकतो. पण प्रेम म्हणजे खूप खूप खोलवर ची भावना...अनोळखी वाटणाऱ्या दूरच्या माणसाला त्याच्या मनाचा अन अस्तित्वाचा आपल्याला थांग सुद्धा नसताना आपण त्याच्या गोड गोड बोलण्याना पसंद करून त्याला आपल्या आयुष्याचा भाग करून घेणं म्हणजे थोडं मूर्खपणाच वाटतो मला . माझ्या बाबतीती असं अनेक वेळा घडलं पण वेळेवर माझ्या विचारांनी मला त्याबद्दल वॉर्निंग दिली . प्रेमात तर सर्व काही सुंदर वाटायला लागतं , सम्रोच्याच काही समजलं नाही तर काळजीने मन दाटायला लागतं , जर त्याचा किंवा तिचा काही प्रतिसाद नाही आला तर काळीज अजून काळजीने तुटायला लागतं .... अर्रर्रर्र ... बरच काही असतं ह्या प्रेमात ... असं लिहत बसलो तर कित्येक पेजेस कमी पडतील . म्हणून उर्वरित भाग नंतर लिहतो ..
to be continued .....
GK SHELKE ,
GOFOUNDER , ONPASSIVE
Comments
Post a Comment