Real Success
खरे यश कसे?
यश म्हणजे फक्त नोकरी ला लागणं , पैसा कमवणे, शेत असणे आणि मोठं घर असणं एवढंच का? समजा मी हे सगळंच मिळवलं , आणि माझ्यात सद्गुण , चांगले वर्तन च नसले तर ते माझं यश ठरेल का? जर माझ्याकडे वरील सर्व गोष्टी असतील तर मुलीच्या घरच्यांना त्यांची मुलगी मला देतांना काही वाटणार नाही बरोबर ना. पण जर माझ्याकडे एवढं सगळं राहून पण माझी वागणूक चांगली नसेल आणि माझ्या मनात स्त्रियांचा आदरच नसेल तर त्यांनी मला त्यांची मुलगी देणं योग्य ठरेल का? आज मी शून्य आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाहीये आणि शेत सुद्धा नाहीये , स्वतःच्या पायावर मी उभा नाही अजून . पण माझ्या मनात चांगले विचार असतील, मुलींची इज्जत असेल, वडीलधाऱ्यांचा आदर असेल, परोपकार मला माहित असेल, लाईफ पार्टनर ला लाईफ टाईम जीव लावण्याची आणि तिच्या छोट्या छोट्या इच्छा व तिचा आत्मसमान जपण्याची क्षमता माझ्यात असेल तर मी यशस्वी नक्कीच राहील हे माझं मत आहे.. तुम्हाला काय वाटते? जेव्हा एक बाप आपल्या मुलींसाठी मुलगा बघतो तेव्हा भौतिक गोष्टींचा च जास्त विचार करतो.पोरगा किती शिकलाय, नोकरीला आहे का, घरी शेत आहे का, घर कसं आहे, पगार किती मिळतो, त्याला भाऊ किती आहेत, वगैरे वगैरे च प्राधान्याने बघितलं जातं..तो सेटल आहे का, नसला तर त्याला रिजेक्ट करा! त्याला जमीन नसली तर रिजेक्ट! वय जास्त असेल मग तो जरी मुलीला पसंद असला किंवा तो तिच्यासाठी बेस्ट असला तरी रिजेक्ट! त्याच्याकडे चांगले विचार असतील, बायकोला समाधानी जीवन देण्यासाठी तो लायक असला तरी त्याला नोकरी नाही , जमीन नाही, वगैरे वगैरे निकषांवर रिजेक्ट केलं जातं! किती मुलांना यश आलंय? ह्यांच्या यशस्वी मुलांना व्यसनं असतील, विचार कसेही असतील, वय कसेही असेल , तरी त्याला आपल्या मुलीची जास्त मर्जी न विचारता तिच्या गळ्यात बांधून दिलं जातं. ही सत्य परिस्थिती आहे..यशस्वी जावई मिळवतात परंतु आपल्या मुलीला खऱ्या अर्थाने यशस्वी नवरा मिळतोय का , ह्याचा विचार किती जण करतात?.. आपल्या मुलीला एखादा कर्तृत्ववान मुलगाही आवडू शकतो असा विचार सहसा कोणी करत नाही. त्यांच्या डोक्यात बस सर्व मुले असलीच फालतू असतात ,असा विचार असतो. यश याला कसे म्हणता येईल? संपत्ती ,जमीन जुमला, शेत वगैरे असलेल्या माणसाच्या मनातही डोकावून बघण्यात किती मुलीचे माय बाप स्वारस्य ठेवतात?.. नुसत्या कमाई वर प्रभावित होऊन मुलीच्या आयुष्याचा निकाल लावला जातो...तिच्या मनाचा जास्त विचार करण्याची जास्त गरज समजली जात नाही... नुसत्या नावाला मुलीची मर्जी विचारली जाते,मात्र लग्न आपल्याच पसंतीच्या मुलाशी करून दिले जाते. हे कोणतं यश? मुलीच्या लाईफ चा एवढा मोठा निर्णय घेतांना तिला मुलामध्ये काय काय अपेक्षित असेल याचाही विचार करणे आवश्यक आहे..तिचेही स्वतः चे अस्तित्व असते.तिलासुद्धा भावना असतात.तिने सुध्दा आपल्या आयुष्याच्या जोडीदारा बद्दल मनात आराखडे तयार करून ठेवले असतील... किंवा तिला कोणी तसा चांगला मुलगाही दिसला असेल पण आई बाबांच्या इच्छेबाहेर, शब्दाबाहेर जाऊन तिला आपल्या आयुष्याचा हा निर्णय घ्यायचा नाही असं तिचं असते... आई वडील कधी मुलीचं वाईट करू शकत नाहीत हे सत्य आहे, पण तिच्या लग्नाचा विषय जरा त्यांनी मनाने केला तर मुलगी जीवनभर खुश राहू शकते.. भलेही काही लोक कमी कमवत असतील, भलेही त्यांचं एवढं सेटल नसेल तरी त्यांचा हार्ट मात्र बेस्ट असतो. त्या हार्ट मध्ये ते ज्यांना जागा देतात, त्याची लाईफ आनंदाने, समाधानाने आणि सुखाने भरून टाकतात!..मी असे किती तरी घरं बघितले जिथं मुली खूप आनंदात आहेत.माझ्या भाषेत तेच लोक खरे यशस्वी आहेत जे कोणाचं मन ओळखू शकतात. जे स्त्रियांना आदर देतात, चांगल्या विचारांनी ज्यांचं मन सतत भरलेलं असतं, आयुष्यातील प्रत्येक क्षण जे आनंदाने जगतात, ज्यांना समाधानाची खरी व्याख्या कळलेली असते, ज्यांना मेहनतीचं महत्व माहीत असते,ज्यांच्यात आत्मविश्वास असतो पण अहंकार नसतो, ज्यांना स्वतः च्या कमाईवर घमंड नसतो, ज्यांना नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी झटावस वाटते, ज्यांना पत्नीचं मन ओळखता येतं, ज्यांना घराला नेहमी जोडून ठेवण्यात आनंद असतो, ज्यांना समाजासाठी काही करण्याची हळहळ असते, ज्यांना येणाऱ्या संधीचा योग्य फायदा घेणं जमते, ज्यांना प्रेमाची किंमत कळते असे सर्व लोक यशस्वी आहेत... त्यांना त्यांच्या आनंदाचं माप माहीत असतं. जगातील सर्व सुख एकीकडे आणि मनाचं समाधान एकीकडे. पारडे नेहमी समाधानाचे च भारी राहते. ज्याच्याकडे समाधान असेल तोच सर्वात यशस्वी...
गणेश शेळके,
Founder member of Onpassive Information technology LLC company, U.S.A.
LAUNCHING SOON....
Comments
Post a Comment