Posts

Showing posts from June, 2021

कसा बसा भेटला जन्म

Image
  कसा बसा भेटला जन्म .... कसा बसा भेटला जन्म , वाया त्याला घालू नका , अति तिथंच माती होते , हे मात्र विसरू नका ... लाख मोती हिरे असतील , अभिमान जास्त बाळगू नका , माणुसकीची भिंत अशी ही सहजतेने पाडू नका ... गरम मनाने ; गरम डोक्याने , निर्णय जास्त घेऊ नका , तरुणपणाचं रक्त हे असं , जास्त उसळी मारू नका .. होतात अनर्थ होतात पापं , चुकीची संगत धरू नका .. मायबापांचं नाव असे हे , धुळीत मिसळून टाकू नका .. होतील चुका हि खूप साऱ्या , पण वारंवार चुकू नका .. एकच धडा घेऊन शहाणा , नम्रपणा सोडून राहू नका .. येतील दिवसही चांगले आपले , विश्वास मनाचा सोडू नका , अन माणुसकीची नाती आपली , आपुलकी कमी करू नका .. G.K.SHELKE , FOUNDER MEMBER OF ONPASSIVE LLC COMPANY ... LAUNCHING SOON... 1 G.K. Shelke Gofounder Onpassive

दाटून येतं मन ...

Image
दाटून येतं मन ....     दाटून येतं  मन , रडून जातं  काळीज ,  सुखदुःखाच्या या वाटेवर ,  चुकते कधी बेरीज ..  अडचण राहते मोठी ,  पण परिस्थिती राहते छोटी ,  काय  होईल कसं  होईल , वाटत राहते भीती ...  हळव्या ह्या भावना ,  कमजोर करती मना , अपेक्षा भंग इतके होऊन ,  तुटून जातो माणसाचा कणा ....  नशिबाची कसोटी ही ,  चालूच राहते सदा ,  जी राहतील शांत नेहमी ,  त्यांचाच जास्त फायदा ...  अनुभवांतून घ्यावी शिकवण ,  एवढंच आजचं  सार , मनच आपलं जर नसेल चांगलं ,  तर काय पैशांचा घालणार खार ??                       गणेश काशिनाथ शेळके ,  FOUNDER MEMBER OF ONPASSIVE  INFORMATION TECHNOLOGY COMPANY .  

REAL SUCCESS...

 खरे यश कसे? यश म्हणजे फक्त नोकरी ला लागणं , पैसा कमवणे, शेत असणे आणि मोठं घर असणं एवढंच का? समजा मी हे सगळंच मिळवलं , आणि माझ्यात सद्गुण , चांगले वर्तन च नसले तर ते माझं यश ठरेल का? जर माझ्याकडे वरील सर्व गोष्टी असतील तर मुलीच्या घरच्यांना त्यांची मुलगी मला देतांना काही वाटणार नाही बरोबर ना. पण जर माझ्याकडे एवढं सगळं राहून पण  माझी वागणूक चांगली नसेल आणि माझ्या मनात स्त्रियांचा आदरच नसेल तर त्यांनी मला त्यांची मुलगी देणं योग्य ठरेल का? आज मी शून्य आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाहीये आणि शेत सुद्धा नाहीये , स्वतःच्या पायावर मी उभा नाही अजून . पण माझ्या मनात चांगले विचार असतील, मुलींची इज्जत असेल, वडीलधाऱ्यांचा आदर असेल,  परोपकार मला माहित असेल, लाईफ पार्टनर ला लाईफ टाईम जीव लावण्याची आणि तिच्या छोट्या छोट्या इच्छा व तिचा आत्मसमान जपण्याची क्षमता माझ्यात असेल तर मी यशस्वी नक्कीच राहील हे माझं मत आहे.. तुम्हाला काय वाटते? जेव्हा एक बाप आपल्या मुलींसाठी मुलगा बघतो तेव्हा भौतिक गोष्टींचा च जास्त विचार करतो.पोरगा किती शिकलाय, नोकरीला आहे का, घरी शेत आहे का, घर कसं आहे, पगार किती म...