कसा बसा भेटला जन्म

 कसा बसा भेटला जन्म ....

कसा बसा भेटला जन्म ,
वाया त्याला घालू नका ,
अति तिथंच माती होते ,
हे मात्र विसरू नका ...
लाख मोती हिरे असतील ,
अभिमान जास्त बाळगू नका ,
माणुसकीची भिंत अशी ही
सहजतेने पाडू नका ...
गरम मनाने ; गरम डोक्याने ,
निर्णय जास्त घेऊ नका ,
तरुणपणाचं रक्त हे असं ,
जास्त उसळी मारू नका ..
होतात अनर्थ होतात पापं ,
चुकीची संगत धरू नका ..
मायबापांचं नाव असे हे ,
धुळीत मिसळून टाकू नका ..
होतील चुका हि खूप साऱ्या ,
पण वारंवार चुकू नका ..
एकच धडा घेऊन शहाणा ,
नम्रपणा सोडून राहू नका ..
येतील दिवसही चांगले आपले ,
विश्वास मनाचा सोडू नका ,
अन माणुसकीची नाती आपली ,
आपुलकी कमी करू नका ..
G.K.SHELKE , FOUNDER MEMBER OF ONPASSIVE LLC COMPANY ... LAUNCHING SOON...
May be an image of 1 person
G.K. Shelke Gofounder Onpassive

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!