दाटून येतं मन ...

दाटून येतं मन .... 

   दाटून येतं  मन ,
रडून जातं  काळीज , 
सुखदुःखाच्या या वाटेवर , 
चुकते कधी बेरीज .. 
अडचण राहते मोठी , 
पण परिस्थिती राहते छोटी , 
काय  होईल कसं  होईल ,
वाटत राहते भीती ... 
हळव्या ह्या भावना , 
कमजोर करती मना ,
अपेक्षा भंग इतके होऊन , 
तुटून जातो माणसाचा कणा .... 
नशिबाची कसोटी ही , 
चालूच राहते सदा , 
जी राहतील शांत नेहमी , 
त्यांचाच जास्त फायदा ... 
अनुभवांतून घ्यावी शिकवण , 
एवढंच आजचं  सार ,
मनच आपलं जर नसेल चांगलं , 
तर काय पैशांचा घालणार खार ??

   
                  गणेश काशिनाथ शेळके , 
FOUNDER MEMBER OF ONPASSIVE 
INFORMATION TECHNOLOGY COMPANY .

 

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!