मैत्री सुखा समाधानाची आणि अभिमानाची...!
11 वी 12 वी चं वर्ष होतं. शहरातल्या सुप्रसिद्ध कॉलेज मध्ये ही कॉमर्स ला आणि तो आर्ट्स ला होता..दोघेही आपापल्या अभ्यासाशी प्रामाणिक होते आणि चांगले हुशार होते.कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर्स व्हायचे त्यामुळं आपल्याला रोज शिकायला भेटते या विचाराने दोघेही खुश होते.त्याला इंग्लिश खूप आवडायचं आणि तिला अर्थशास्त्र.आर्टस् आणि कॉमर्स यांचा अर्थशास्त्र हा विषय कॉमन होता.त्यामुळे रोज त्यांचा एकत्रित एका वर्गातच पिरेड व्हायचा.सर मुलांना प्रश्न विचारायचे आणि ज्यांना येते त्यांना हात वर करायला सांगायचे.मग काय, ह्या दोघांचाही हात नेहमी उत्तरासाठी वर असायचा.सरांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघंही आत्मविश्वासानं द्यायचे.त्यामुळे ते दोघेही सरांचे फेव्हरेट विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे.याच गोष्टीतून दोघांची एकमेकांशी चांगली ओळख झाली होती.पण ते कधी एकमेकांशी समोरून बोलत नव्हते.बस पिरेड चालू झाल्यावर एकमेकांकडे बघून आदराने स्मितहास्य करायचे.ह्याला अर्थशास्त्र थोडा किचकट वाटायचं आणि तिला इंग्रजी...
एक दिवस झालं असं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आर्ट्सच्या क्लास मध्ये आली.त्यावेळेस हा इंग्रजी ची नोट्स लिहीत होता.तिने ते बघितलं आणि सहज त्याची नोट्स मागितली. प्रथमतः तिने त्याच्याशी मोकळेपणाने मागणी केली होती त्यामुळे त्याने तिला नोट्स दिली.त्याची नोट्स खूप छान अक्षरात आणि सुंदर होती.तिला ती खूप आवडली.तिला इंग्रजी अवघड जाते असे ती सांगू लागली. आणि ह्याला अर्थशास्त्र अवघड जाते हे ह्यानेही कबूल केले. मग काय,

दोघांनीही एकमेकांना मदत करण्याचे ठरवले.दोघांकडेही मोबाईल फोन होते.त्यांनी गुपचूप भेटून एकमेकांचे नंबर्स मिळवले.कारण मुलं मुली वेगळा विचार करतील हे त्यांना माहीत होते...मग रोज संध्याकाळी 7 वाजता आठवणीनं कॉल्स व्हायला लागले. अभ्यासाच्या टिप्स दिल्या जाऊ लागल्या.एकमेकांना समजावत असतांना त्यांची रिव्हिजन व्हायची..त्यामुळे हळू हुळू त्यांचे विषय त्यांना अधिक सोपे वाटू लागले.मग ते एकमेकांचे खूप जवळचे मित्र बनले. ते आपापली सर्व सुख दुःख वाटू लागले..त्यांची जवळीक बघून वर्गातल्या मुलामुलीं त्यांना चिडवू लागले.पण त्या चिडवण्याचा त्यांच्यावर कधीच निगेटिव्ह इफेक्ट झाला नाही. कारण दोघांनाही आपल्या परिस्थिती ची जाणीव होती.हे प्रेम वगैरे भानगडी नुसता टाईमपास असतो ही चर्चा नेहमी त्यांच्यात रंगायची.एकमेकांच्या रिलेशन बद्दल ते अगदी स्पष्ट होते.गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे विचित्र प्राणी असतात जे आपल्या वागण्या बोलण्यात अडचणी निर्माण करत असतात असे त्यांचे मत होते.त्यांची मते खूप जुळणारी होती.कधीकधी या गोष्टींचेही त्यांना नवल वाटायचे..
ते रोज एकमेकांना भेटायचे.एकमेकांना समजून घ्यायचे.ते बेस्ट फ्रेंड्स होते.तिच्या सुंदरतेमुळे,सद्गुणांमुळे ती कोणालाही आवडेल अशी होती.तोही तितकाच देखणा ,रुबाबदार ,स्पष्टवक्ता ,हिमती आणि मेहनती होता.कॉलेज सुटल्यावर तो रोज पार्टटाइम जॉब ला जायचा आणि रात्री 9 वाजता बस ने घरी जायचा. हे तिला त्याच्या एका मैत्रिणीकडून कळलं तेव्हा त्याच्याबद्दल तिच्या मनातला आदर अजून वाढला...तिला आणि त्याला काही मुला मुलींनी प्रपोजही केलेलं होतं.पण प्रेमाबद्दल यांचं मत स्पष्टच होतं.त्यांना त्यांच्या मधात तिसऱ्या चौथ्या व्यक्तीला अजिबातच आणायचं नव्हतं.कारण ते एकमेकांच्या नात्यात खूप समाधानी आणि खुश होते. खरं म्हणजे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं .पण ते प्रेम निस्वार्थी आणि समजदार प्रेम होतं. त्यांनी कधीही डोक्यात प्रेम वगैरे चं भूत येऊ दिलं नाही.त्यांच्या आगळ्या वेगळ्या फ्रेंडशिप मुळे त्यांच्या अभ्यासात विलक्षण प्रगती घडवून आणली होती.आपापले आवडीचे विषय सरांकडून चांगले शिकून घेऊन ते त्यांची रिव्हिजन एकमेकांकडून करून घ्यायचे. शिक्षक वृंदानाही ती गोष्ट फार आवडली होती..कित्येक जणांनी त्यांच्यात प्रेमाचं खूळ लावण्याचा प्रयत्न केला पण ते दोघेही जिद्दी. त्यांच्या कॉलेज मध्ये चालणाऱ्या अनेक लफडयांचे दुष्परिणाम त्यांनी जवळून बघितले होते.मग तसल्या भानगडीत पडायचा मूर्खपणा आपण करायचा नाही असा सुंदर विचार त्यांच्या मनात होता.
बघता बघता 11 वी सरली आणि परीक्षेचा निकाल लागला.हिला 84 आणि त्याला 86 टक्के पडले..कॉमर्स च्या मानाने तिची प्रगती खूप जबरदस्त होती.त्याचीही मेहनत फळास आली होती.ते दोघेही खूप खुश होते..मग सुट्ट्या लागल्या आणि त्यांचे कॉल्स अजून वाढले..त्यांनी एकमेकांच्या रिलेशन बद्दल घरी स्पष्ट कल्पना दिलेली होती.इन फॅक्ट, त्यांनी एकमेकांच्या आई वडीलांचीही मनं जिंकली होती.हा गरीब घरचा मुलगा आणि ती मध्यमवर्गीय सर्व्हिस वाल्या वडिलांची एकुलती एक मुलगी. ह्याला आपल्या गरिबीची जाणीव होती आणि त्यामुळेच आपल्या मैत्रीमध्ये आवश्यक तेवढी मर्यादा त्याने ठेवली होती...नंतर पुढे बारावी चं वर्ष होतं तर आपण आपला अभ्यास अजून वाढवावा असं दोघांनाही वाटू लागलं..मग त्यांनी आपल्या कॉल्स ना मर्यादा घातली.आता त्यांना शिक्षकांनीही पसंती मिळाल्यामुळे ते कॉल्स पेक्षा एकमेकांजवळ वर्गात बसूनही अभ्यासाची चर्चा करू लागले.त्यांनी नेहमी आपल्या मैत्रीला पवित्र स्थान दिले.कधीही वेगळा विचार केला नाही. प्रेम तर मित्रांवरही करता येतं असं त्यांचं होतं.कित्येकवेळा गप्पा मारतांना ते एकमेकांना गंमती जमतीत आय लव्ह यु पण म्हणायचे. त्यांना काही फरक पडत नव्हता.मन निर्मळ असलं की कशाचीच भीती बाळगायची गरज नसते हे ते जाणत होते.त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की त्यांचे घरचे त्यांना घरी जेवायला बोलावू लागले.त्यांना त्यांच्या मैत्री चा सार्थ अभिमान होता.आपल्याला अशी समजदार, गुणवान ,हुशार मुलं लाभली याचे समाधान त्यांच्या डोळ्यात तरळत असे...घरच्यांचा आपल्यावरील एवढा विश्वास बघून ह्यांची मैत्री अजून चांगलं स्वरूप धारण करू लागली...बारावी चा निकाल लागला .दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.कॉलेजमध्ये मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणून ह्यांचे नाव घेतले जाऊ लागले..
मग शेवटी असा दिवस आला की दोघांनाही आपल्या कॉलेज चा निरोप घ्यावा लागला.आता पुढील शिक्षणासाठी यांचे मार्ग वेगवेगळे होणार होते..हिला बी कॉम करायचे होते आणि ह्याला बी ए.. पण ह्याने चौकशी केल्यावर ह्याला कळले की बी कॉम वर खूप सारे जॉब्स आहेत. करिअर च्या अनेक संधी आहेत.मग त्यानेही बी कॉम लाच ऍडमिशन घेण्याचं ठरवलं.हे कळल्यावर तिच्या तर आनंदाला सीमाच उरली नाहीं.. आता पुढचे 3 वर्षे सुद्धा आपण सोबत असणार या आनंदाने ते पुढे येणाऱ्या सुंदर क्षणांचे स्वप्न आतापासूनच रंगवू लागले...
अशी ही त्याची आणि तिची मैत्री. अलग सलग जगावेगळी... अशी मैत्री होणे शक्य वाटत नाही.कारण हल्लीच्या पिढीला मुला मुलीच्या मैत्री मध्ये जास्त इंटरेस्ट दिसत नाही.. एका हप्त्याच्या मैत्री नंतर एकमेकांना प्रपोज मारला जातो आणि त्या मैत्री ला प्रेमाचं स्वरूप दिलं जातं...चांगल्या मैत्री ला कात्री लावून प्रेमाचं खूळ वागवणार्या च्या नशिबी शेवटी ब्रेक अप येतो. मग रडापडी चा, धोकेधडीचा सिलसिला सुरू होतो...आशा रिलेशन पेक्षा सर्वांच्या हृदयात राज्य करणारी ,समाधान मिळवून देणारी मैत्री बरी नव्हे का?...
लेखक: गणेश काशिनाथ शेळके.
..
👍🏻👍🏻👍🏻excellent bro
ReplyDeleteOh thanks...
DeleteVery nice gk
ReplyDelete