लग्न म्हणजे ..... (भाग ८)

*लग्न म्हणजे....*
*(भाग ८)* 

   लग्नाचा जोडीदार निवडताना अनेक गोष्टीं आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. अरेंज मॅरेज असेल तर आपल्या घरच्यांना आणि जर स्वातंत्र्य असेल तर मुला मुलींना सुद्धा याचा स्वतः निर्णय घेता आला पाहिजे. हल्ली लग्नाची बोलणी सुरू झाल्यावर लगेच साखरपुडा किंवा एंगेजमेंट करण्यासाठी घाई केली जाते. म्हणजे एकदा जर का एंगेजमेंट झाली तर मुलगा मुलगी एकमेकांना भेटायला, बोलायला मोकळे...! मग कॉल व्हिडिओ कॉल सुरू होतात. हल्लीचे मुलं मुली फोनवर बोलताना जे महत्त्वाचे आहे ते बोलतच नाहीत. म्हणजे तुझा आवडता हिरो कोणता, तुला कुठे हिंडायला जावंयास आवडते, वगैरे वगैरे अशा टाइमपास गोष्टी केल्या जातात.. त्यापेक्षा एकमेकांचा स्वभाव कसा आहे, काय काय सवयी आहेत, चांगले गुण कसे आहेत, कोणती वाईट सवय आहे, अमुक अमुक परिस्थितीमध्ये मी जर असा वागलो, अशी वागले तर तुम्ही /तू काय करसाल/करशील, समजा माझी ननंद, सासु अशी अशी असेल तर मी कसं वागायला पाहिजे, माझे सासरे माझे साले अमुक अमुक वागले तर मी कसा वागायला पाहिजे इत्यादी गोष्टी फोनवर किंवा भेटल्यावर बोलल्या जातात का?.. क्वचितच नवीन मुलं मुली अशा गोष्टी लग्नाआधी एकमेकांना विचारत असतात. म्हणूनच त्यांच्यामध्ये लग्नानंतर एक योग्य अंडरस्टँडिंग निर्माण होण्यास मदत होते. परिस्थितीनुरूप एकमेकांना कशा पद्धतीने आपण हँडल करू शकतो ही समज निर्माण होण्यासाठी असे अनेक प्रश्न लग्नाआधी कॉल वर किंवा भेटून क्लिअर केल्या गेले पाहिजेत. जर साखरपुड्या आधीच अशा गोष्टी क्लियर झाल्या तर बरे राहते. लग्न जमण्याआधीच मुलाचा स्वभाव,आवड,नावड,छंद,वागणूक, व्यावहारिकपणा, वेगवेगळ्या परिस्थितीत मते, निर्णयक्षमता इत्यादी ची माहिती जर मुलींना मिळाली तर एक निरोगी नातं बनू शकतं..
            आयुष्यभर सोबत राहायचे म्हटले तर एकमेकांना कोणत्या गोष्टीचा राग येतो, कोणती गोष्ट केल्यावर छान वाटते हे माहीत असलं पाहिजे.  एकमेकांच्या फॅमिलीच्या लोकांचे स्वभाव माहीत असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. रोमँटिक बोलावं, पण त्यासोबतच घरच्या लोकांना मुलीसाठी आणि मुलीला घरच्यांसाठी कम्फर्टेबल वातावरण निर्माण होईल असाही संवाद साधणं ही मुलाची जबाबदारी असते. कारण दिवसभर नवरा काम करत असेल तर बायकोचा थेट संबंध तिच्या घरच्या सोबत जास्त येतो. एकमेकांवर फक्त प्रेम असून चालत नाही, तर एकमेकांच्या फॅमिलीच्या गुण दोषाना सुद्धा स्वीकारायचं असतं. हल्ली जे घटस्फोट होतात त्यातील 90% घटस्फोट हे नवऱ्याच्या आई किंवा बहिणीमुळे किंवा सासरच्या जाचां मुळे होतात . याचा अर्थ लग्न टिकवण्यासाठी मुलाला आणि मुलीला स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना आदर आणि मान देऊन राहणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा येणाऱ्या मुलीला किंवा मुलाला आपली सून किंवा जावई न समजता स्वतःचा मुलगा  ,मुलगी म्हणून वागणूक द्यायला हवी. हल्लीचे बरेच लोक आपल्या सुनेला मुलीसारखी वागणूक देतात  आणि तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिला सपोर्ट करतात. पण समाजामध्ये असे काही नालायक लोक आहेत जे अजूनही जुन्या फालतू विचारांच्या पायी मुलीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करतात. ज्यांना स्वतःला मुलगी असूनही ते जर दुसऱ्याच्या मुलीला हीन वागणूक देत असतील तर त्यांच्या कुबुद्धीचे प्रमाण भेटून जाते... छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांचा हेवा करण्यात काय मोठेपणा वाटतो यांना कुणास ठाऊक ?……

✒️ *ग.का.शेळके* 
     *(G.K.Shelke)*

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!