Posts

Showing posts from July, 2019

आत्ताचं प्रेम..

आयुष्यातले कितीतरी क्षण आपण प्रेमासाठी घालतो , पण त्यात पडलेल्या पैकी एखादाच प्रगतीही करतो... कलियुगातलं हे प्रेम क्षणात जुळतं, पण कंटाळा आला म्हणून दुरही पळतं... आताच्या काही प्रेमींची बाप्पा लक्षणंही विचित्र असतात, प्रेमात पडले म्हणजे घरच्यांनाही  विसरत असतात... पहिली गोष्ट म्हणजे या प्रेमाचा काही नेम च नसतो , हृदयाशी खेळला जाणारा तो एक गेमच असतो ... मी म्हणतो प्रेम कसं समजून व्हायला हवं, आपली माणसं आणि प्रगती ही सोबत राहील एवढं मात्र पाहायला हवं... खुपच वेळ वाया जातो या प्रेमात कळतही नसतं, अन कळतही असलं तरी मन वळत  नसतं, प्रेम असतं एक निस्वार्थी बंधन , हृदय नसतं त्यात वाईट हेतूंचं सदन , खरं प्रेम जेव्हा करायला लागतील सर्व, तिथंच निर्माण होऊ शकेल आणखी एक नंदनवन...!               गणेश शेळके           (१३-०६-२०१८)

महत्वाचं आहे, वाचाल तर कळेल...

Image
१० वी चा निकाल लागला की  एक मोठा प्रश्न विद्यार्थ्या समोर उभा राहतो.आता पुढं काय करायचं? कसं करायचं?त्यासाठी खर्च किती येईल?...विद्यार्थ्यानपेक्षा त्यांचे पालक जास्त चिंतेत असतात.मला काही पालक नेहमी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी ,त्यांच्या प्रगतीविषयी प्रश्न विचारत असतात...कसंय की आजच्या काळात स्पर्धा खूप वाढत आहे.त्याहीपेक्षा शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चात खूप वाढ झालीय.आता १० वी नंतर तुम्ही जर मुलांना सायन्स ला टाकसाल, तरी आपल्या कडची शिक्षण पद्धती इतकी भारी आहे की bsc नंतर च्या स्पर्धेत मुलांना नीट टिकू पण देत नाही उलट खूप सारा खर्च करुन झाल्यानंतर आपल्याकडची सायन्स केलेली पोरं सुद्धा एमपीएससी च्या नादास लागतात..। कारण bsc तसेच इतर सायन्स अभ्यासक्रमात तग धरून ठेवण्याची क्षमता फक्त पुष्कळ धनवान आणि योग्य बौद्धिक पातळी असलेल्या पाल्यांमध्येच असते...पैसा बोलतो ,जमाना हलतो अशी गत झाली आहे...गरीब होतकरू मुलांमध्ये क्षमता असूनही ते सायन्स करू शकत नाहीत तेव्हा त्यांनी आर्टस् किंवा कॉमर्स निवडणेच योग्य ठरते.मी सायन्स चे फॉर्म भरले आणि आर्टस् लाच ऍडमिशन घेतली .कारण मी चारही बाजूने विचा...

हिरमुसलेल्या...

Image
हिरमुसलेल्या चेहऱ्यावर खळी जराशी  पडू दे, बहर येईल समृद्धीचा, असं काहीतरी घडू दे... घाई गडबड, होई तडफड, सावरायला मनांना साऱ्या, आधार कोणी मिळू दे..। सुरकुत्या या  चिंतेच्या, थोड्यातरी कमी होऊ दे... मीपणावर मात अन, चांगल्याची किंमत होऊ दे                - गणेश शेळके

घृणांचा पडला प्रभाव असा...

घृणांचा पडला प्रभाव असा , जनावरांचीही  वाटणी झाली, बकरा झाला मुसलमानांचा,  अन गाय बिचारी हिंदूं झाली. मी पाहिले मंदिरांत हिंदू , मस्जिदीत मला मुसलमान दिसले, जाऊन बघितलं रात्री मदिरालायात,  तेच मला माणसं भासले... ही झाडं ,ही पानं,या फांद्यासुध्दा त्रस्त होतील, जर पाखरंसुध्दा काही हिंदू  अन काही मुसलमान होतील , सुके मेवे सुद्धा  बावळून गेले, कसे काय नारळ हिंदू, अन खजूर मुसलमान झाले ? जसे धर्मजातीमध्ये रंगांनाही वाटलं आहे, लाल  रंग म्हणजे हिंदूं , तर हिरवा रंग मुस्लिम आहे... तो दिवस दूर नाही , जेव्हा सगळ्याच्या सगळ्या भाज्या मुसलमानांच्या होतील, अन हिंदूंच्या हिश्यात   गाजर टमाटे काकड्या उरतील! आता प्रश्न असाय की टरबूज कुणाचं म्हणायचं? ते बिचारं वरून राहील मुसलमानांचं अन आतून राहील हिंदूंचं !... (हिंदीतून भाषांतरित करण्याचा छोटासा प्रयत्न...)     गणेश शेळके.