घृणांचा पडला प्रभाव असा...
घृणांचा पडला प्रभाव असा ,
जनावरांचीही वाटणी झाली,
बकरा झाला मुसलमानांचा,
अन गाय बिचारी हिंदूं झाली.
मी पाहिले मंदिरांत हिंदू ,
मस्जिदीत मला मुसलमान दिसले,
जाऊन बघितलं रात्री मदिरालायात,
तेच मला माणसं भासले...
ही झाडं ,ही पानं,या फांद्यासुध्दा त्रस्त होतील,
जर पाखरंसुध्दा काही हिंदू
अन काही मुसलमान होतील ,
सुके मेवे सुद्धा बावळून गेले,
कसे काय नारळ हिंदू,
अन खजूर मुसलमान झाले ?
जसे धर्मजातीमध्ये रंगांनाही वाटलं आहे,
लाल रंग म्हणजे हिंदूं ,
तर हिरवा रंग मुस्लिम आहे...
तो दिवस दूर नाही ,
जेव्हा सगळ्याच्या सगळ्या भाज्या मुसलमानांच्या होतील,
अन हिंदूंच्या हिश्यात
गाजर टमाटे काकड्या उरतील!
आता प्रश्न असाय की टरबूज कुणाचं म्हणायचं?
ते बिचारं वरून राहील मुसलमानांचं
अन आतून राहील हिंदूंचं !...
(हिंदीतून भाषांतरित करण्याचा छोटासा प्रयत्न...)
गणेश शेळके.
Comments
Post a Comment