महत्वाचं आहे, वाचाल तर कळेल...
१० वी चा निकाल लागला की एक मोठा प्रश्न विद्यार्थ्या समोर उभा राहतो.आता पुढं काय करायचं? कसं करायचं?त्यासाठी खर्च किती येईल?...विद्यार्थ्यानपेक्षा त्यांचे पालक जास्त चिंतेत असतात.मला काही पालक नेहमी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी ,त्यांच्या प्रगतीविषयी प्रश्न विचारत असतात...कसंय की आजच्या काळात स्पर्धा खूप वाढत आहे.त्याहीपेक्षा शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चात खूप वाढ झालीय.आता १० वी नंतर तुम्ही जर मुलांना सायन्स ला टाकसाल, तरी आपल्या कडची शिक्षण पद्धती इतकी भारी आहे की bsc नंतर च्या स्पर्धेत मुलांना नीट टिकू पण देत नाही उलट खूप सारा खर्च करुन झाल्यानंतर आपल्याकडची सायन्स केलेली पोरं सुद्धा एमपीएससी च्या नादास लागतात..। कारण bsc तसेच इतर सायन्स अभ्यासक्रमात तग धरून ठेवण्याची क्षमता फक्त पुष्कळ धनवान आणि योग्य बौद्धिक पातळी असलेल्या पाल्यांमध्येच असते...पैसा बोलतो ,जमाना हलतो अशी गत झाली आहे...गरीब होतकरू मुलांमध्ये क्षमता असूनही ते सायन्स करू शकत नाहीत तेव्हा त्यांनी आर्टस् किंवा कॉमर्स निवडणेच योग्य ठरते.मी सायन्स चे फॉर्म भरले आणि आर्टस् लाच ऍडमिशन घेतली .कारण मी चारही बाजूने विचार करून निर्णय घेतला होता.सायन्स करावं असं प्रत्येकाला वाटतं,पण ती गरिबाला परवडणारी गोष्ट अजिबात नाही. जास्तीत जास्त आपण bsc करू, पण bsc पास करायलाही खूप कष्ट लागतात. आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत लागोपाठ होतच राहील याचाही नेम पाहिजे. पैशा अभावी सायन्स सोडून घरी आलेले खूप मित्र मी बघितले आहेत.पालकांच्या एका चुकीच्या निर्णयामुळं मुलाला पुढं अनेक गोष्टींचा त्रास घ्यावा लागू शकतो..माझ्यामते, मुलाच्या बौद्धिक पातळीला अनुसरूनच पालकांनी त्यांना त्यांचे क्षेत्र बहाल करावं. आर्टस् ,कॉमर्स आणि सायन्स यापैकी सायन्स सोडलं तर बाकी दोन क्षेत्र आपापल्या क्षेत्रात उत्तम ठरतात.आर्टस् घेतलं तर व्यक्तीचे व्यक्तीमत्व बदलून जाते,आत्मविश्वास, सामाजिक जाणिव तसेच अन्य विचारांचे संस्कार मुलांना आर्टस् मधून च भेटतात.पण आज भावनांपेक्षा पैसा पाहिला जातो आणि पैशासाठी सायन्स चाच विचार होतो.या दौडीत कॉमर्स वर दुर्लक्ष करणे अयोग्यच ठरते.जिथं arts भावनांना उजाळा देते तिथे कॉमर्स व्यवहारीकतेला चालना देण्याचे काम करत असते. आर्टस् मध्ये आणि कॉमर्स मध्ये खर्चाचा थोडा फरक पडतो. पण कॉमर्स क्षेत्र माझ्या मते खूप उत्तम आहे.आज अनेक बॅंक्स, ऑफिसेस, कंपनीज,इंडस्ट्रीज,फॅक्टरीज तसेच मोठमोठी महाविद्यालये इत्यादी सर्व ठिकाणी कॉमर्स ला खूप वाव आहे.कॉमर्स चा विद्यार्थी कधी जास्त दिवस बेकार राहणार नाही असं म्हटलं जातं. बस थोडंसं स्ट्रगल आणि थोडीशी धावपळ सहन केल्यास समाधानकारक नोकरी मिळू शकते. कलेक्टर, पोलीस ,आयपीएस साठी आर्टस् उत्तम राहते. डॉक्टर, इंजिनिअर इ.साठी सायन्स आणि सर्व व्यापारी, तरच बिजनेस क्षेत्रात कॉमर्स साठी चान्सेस असतात..ज्यांना वाटतं की आपण खूप शिकलो म्हणजे सहज नोकरी भेटेल ,त्यांनी हा गोड गैरसमज मनातून काढून टाकावा कारण इथं स्पर्धा खूप आहे.एका जागेसाठी कितीतरी हजार जणांचे अर्ज येत असतात. काही पोस्ट साठी चाळणी असते जी उत्कृष्टात उत्कृष्ट उमेदवार निवडत असते.प्रत्येक ठिकाणी काही ना काही घोळ असतो जो सामान्य माणसाला समजत नाही आणि तो त्या घोळात कधी कधी फसून जातो..थोडक्यात आपली सिस्टीम ही शिक्षण आणि नोकरी बाबत अगदी विसंगत आहे.यात नेहमी न्याय होईलच असे नाही..पद किंवा जागेसाठी लाखो रुपये भरायला सांगितले जातात जे गरीब स्वप्नातही भरू शकत नाहीत...शेवटी संभाव्य आर्थिक अडचणी पायी साधा माणूस कोणत्याही कंपनीत,कार्यालयात, हॉटेलात धक्के खातांना दिसत असतो...आपल्या देशात फक्त सर्टिफिकेट ला महत्व दिलं जातं.मग ते पैसे भरून का मिळवलेलं असोत ना काहीच फरक पडत नाही.भ्रष्टाचार, राजकारण, हेवा - देवा,मुस्कटदाबी, चोरावर मोर ,तसेच विविध षडयंत्र यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य माणसाला बेईमान झाल्याशिवाय पर्याय उरत नाही..शेवटी जो सिस्टीम चा होऊन लढतो तोच यश मिळवतो..इमानदार, प्रामाणिक, कष्टकरी माणूस नेहमी गरिबीचे धक्के खात जगतो...
गणेश शेळके.
गणेश शेळके.
Mast.....💐
ReplyDelete