Popular posts from this blog
लग्न म्हणजे ..... (भाग ८)
*लग्न म्हणजे....* *(भाग ८)* लग्नाचा जोडीदार निवडताना अनेक गोष्टीं आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. अरेंज मॅरेज असेल तर आपल्या घरच्यांना आणि जर स्वातंत्र्य असेल तर मुला मुलींना सुद्धा याचा स्वतः निर्णय घेता आला पाहिजे. हल्ली लग्नाची बोलणी सुरू झाल्यावर लगेच साखरपुडा किंवा एंगेजमेंट करण्यासाठी घाई केली जाते. म्हणजे एकदा जर का एंगेजमेंट झाली तर मुलगा मुलगी एकमेकांना भेटायला, बोलायला मोकळे...! मग कॉल व्हिडिओ कॉल सुरू होतात. हल्लीचे मुलं मुली फोनवर बोलताना जे महत्त्वाचे आहे ते बोलतच नाहीत. म्हणजे तुझा आवडता हिरो कोणता, तुला कुठे हिंडायला जावंयास आवडते, वगैरे वगैरे अशा टाइमपास गोष्टी केल्या जातात.. त्यापेक्षा एकमेकांचा स्वभाव कसा आहे, काय काय सवयी आहेत, चांगले गुण कसे आहेत, कोणती वाईट सवय आहे, अमुक अमुक परिस्थितीमध्ये मी जर असा वागलो, अशी वागले तर तुम्ही /तू काय करसाल/करशील, समजा माझी ननंद, सासु अशी अशी असेल तर मी कसं वागायला पाहिजे, माझे सासरे माझे साले अमुक अमुक वागले तर मी कसा वागायला पाहिजे इत्यादी गोष्टी फोनवर किंवा भेटल्यावर बोलल्या जातात का?.. क्वचितच नवीन मुलं मुली ...
मैत्री सुखा समाधानाची आणि अभिमानाची...!
11 वी 12 वी चं वर्ष होतं. शहरातल्या सुप्रसिद्ध कॉलेज मध्ये ही कॉमर्स ला आणि तो आर्ट्स ला होता..दोघेही आपापल्या अभ्यासाशी प्रामाणिक होते आणि चांगले हुशार होते.कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर्स व्हायचे त्यामुळं आपल्याला रोज शिकायला भेटते या विचाराने दोघेही खुश होते.त्याला इंग्लिश खूप आवडायचं आणि तिला अर्थशास्त्र.आर्टस् आणि कॉमर्स यांचा अर्थशास्त्र हा विषय कॉमन होता.त्यामुळे रोज त्यांचा एकत्रित एका वर्गातच पिरेड व्हायचा.सर मुलांना प्रश्न विचारायचे आणि ज्यांना येते त्यांना हात वर करायला सांगायचे.मग काय, ह्या दोघांचाही हात नेहमी उत्तरासाठी वर असायचा.सरांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघंही आत्मविश्वासानं द्यायचे.त्यामुळे ते दोघेही सरांचे फेव्हरेट विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे.याच गोष्टीतून दोघांची एकमेकांशी चांगली ओळख झाली होती.पण ते कधी एकमेकांशी समोरून बोलत नव्हते.बस पिरेड चालू झाल्यावर एकमेकांकडे बघून आदराने स्मितहास्य करायचे.ह्याला अर्थशास्त्र थोडा किचकट वाटायचं आणि तिला इंग्रजी... एक दिवस झालं असं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आर्ट्सच्या क्लास मध्ये आली.त्य...

Comments
Post a Comment