दिल खोल के खुशी मना मेरे दोस्त,

आयुष्य कुठपर्यंत साथ देईल हे सांगता येत नाही... पण जितकं जगायचं न, सालं मोकळं हसून जगायचं..! घरातल्या, दारातल्या ,कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीकडे गंमतीने लक्ष द्यायचं !.. सिरीयस चेहरा ठेवून आपल्यावर प्रेम करणाऱ्या ला उदास कशाला बरं करायचं..? एन्जॉय करत राहायचं, प्रत्येक घटनेकडे पोजिटिव्हली बघायचं... पोरीने धोका दिला, घरचे त्रास देतात, दिवस बोर जातो, कोणी भाव देत नाही, हे सारे साले बहाणे आहेत जीवनातले आपल्याला एन्जॉय पासून परावृत्त करण्यासाठी ! पैसे कमवायचेत ,घर चालवायचंय, जबाबदारी जास्त आहे, घरचा मोठा आहे, लोकं नाव ठेवतात, ह्या असल्या छटाक कारणामुळे स्वतः ला गमावू नका, प्रत्येक दिवस आनंदाने जगण्यासाठी ,कुणाला तरी हसवण्यासाठी, त्याला आपण आहोत असं स्पेशल वाटण्यासाठी काहीतरी करावं, असं काहीतरी आपल्या वागण्यात पाहिजे ! निसर्गाने दिलेल्या शरीर संपत्तीचा महत्वाचा भाग म्हणजे आपला चेहरा. मग तो कसाही असला तरी तो आपल्या स्वतः साठी जगातला सर्वात सुंदर चेहरा असला पाहिजे ! फेकून द्या साला तो न्यूनगंड ! की मी दिसायला असा, तसा ! ज्याचं मन नेहमी दुसऱ्याला आनंदात पाहून खुश होतं...