मुलांना फक्त मोठं करून कर्तव्य संपत नाही..
मुलं जर सुधरण्याचा प्रयत्न करत असतील तर आई वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांना समजून घ्यावं.त्यांच्या चुकांबद्दल कर्कशपणे ओरडून ओरडून त्याचं डोकं खराब करण्यापेक्षा त्याना शांत चित्ताने प्रेमानं बोलून समजावून सांगितलं तर ते तुमचं नक्कीच ऐकतील किंवा थोडं समजून तरी घ्यायचा प्रयत्न करतील..पण जर तुम्ही त्यांच्या एखाद्या चुकीवर वारंवार बडबड बडबड सुरूच ठेवत असाल,वारंवार त्यांना त्याच चुकीची आठवण करून देत असाल,तर ते सुधरणार तर नाहीच नाही ; पण त्यांचा सुरू असलेला प्रयत्नही ते बंद करून टाकतील...
तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केलं,कितीही दिवस रात्र काम करून त्यांना हवं ते दिलं तरी मी वर बोलल्याप्रमाणे जर तुम्ही त्यांना समजून न घेता तसे वागले,तर माफ करा साहेब, त्यांना बिघडायला बिलकुल वेळ लागणार नाही.मुलगा जर खूप शिकूनही बेरोजगार राहत असेल तर त्याबद्दल त्याच्यावर ओरडत राहिल्यापेक्षा त्याला एकांतात नेऊन त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवून बस थोडं प्रेमानं त्याचा प्रॉब्लेम विचारल्यास त्याला कन्फरटेबल होईल आणि तो त्याचं मन तुमच्या जवळ मोकळं करेल.पण दुर्दैवाने असे पालक खूप कमी आहेत जे मुलांना समजून घेतात किंवा तसा प्रयत्न करतात...आपण मुलांना लहानाचे मोठं करतो.तेव्हा तो मुलगाही तो संघर्ष बघूनच मोठा होतो ना. मग त्याला वारंवार आपण घेतलेल्या कष्टांची आठवण वेगवेगळ्या अपशब्दांनी देत राहणं योग्य आहे का! बिलकुल नाही! त्यामुळं मुलं अजून बिघडून जातात.त्यांना कुणासाठीच चांगलं बनण्याचं कुतूहल राहत नाही.ते एकट्यात राहून व्यसनं, गर्लफ्रेंड, टाईमपास करणं पसंत करतात.कारण त्यांच्यानुसार त्यांना समजून घेणारं घरात कोणीच नसतं म्हणून ते वेगळा मार्ग निवडतात.आपण त्यांना कसा माहोल देतो यावरही त्यांची वागणूक अवलंबून असावी.
मुलं म्हणजे नाजूक पाकळी सारखे असतात.त्यांना चांगलं जपलं नाही तर तेपण कळ्याप्रमाणे कोलमडून जातात.. काही पालक हे मुलांसमोर भांडतात.त्यामुळं मुलांवर त्याचा खूप वाईट परिणाम म्हणून तेही एखाद्या दिवशी तसेच वागतात.मग त्यावेळेस त्यांना आपण कितीही समजावून सांगून काही फायदा होत नाही.मुलांना वारंवार जाणीव करून देत राहणे की त्यांच्यासाठी आपण खूप काही केलं,आपण कष्ट केले म्हणून त्यांना चांगलं आयुष्य मिळालं इत्यादी मुळे त्यांच्या मनांवर परिणाम होतो.मुलांचं विचित्र वर्तन हे त्यांच्यावरील वाईट वातावरणाच्या प्रभावामुळे घडत असतं.वडील दारू पितात म्हणून घरात तमाशा होतो.वडिलांना दारूची आणि आपल्याला त्यांची सवय युज्ड टू झालेली असते.पण आई मात्र वडिलांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून वारंवार मुलांजवळ बसून प्रत्येक वेळी मोठमोठ्याने ओरडून ओरडून नवऱ्याला बडबड करत दोष देत असेल तर हे मुलांच्या मनावर खूपच भयानक परिणाम घडवून आणू शकतं..काही पालकांचं तर वेगळंच चालतं.आपल्या वडिलांचे, सासू सासऱ्याचे किंवा पूर्वजांनी केलेल्या काही चुकांचे वारंवार पोरांसमोर उकिरडे उकरत बसतात.त्यामुळं मुलं आपल्या आजोबा ,आजी बद्दल निगेटिव्ह होऊन जातात आणि त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत.भूतकाळ वाईट असला म्हणून काय वर्तमानालाही वाईट बनवून टाकायचं? कोवळ्या वयात मुलांच्या मनात विष पेरलं जातं आणि आज्ञाधारकतेचा गुण घ्यायला त्यांना जड जाऊ लागतं.वारंवार फक्त वाईट गोष्टीचीच चर्चा मुलांसमोर केल्याने मुलंही चुकांनाच जास्त महत्व देऊ लागतात.त्यात मुलांचा काय दोष?त्या मुलांची मानसिकता पार बिघडून जाते.त्यांना योग्य अयोग्य कळतं पण आईवडीलच एकापेक्षा एक वाईट वागत असतील तर मुलांना चांगलं वागायचं सुचेल तरी कसं?...
काही पालक तर विचारूच नका, मुलानं एखादं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो नकळतपणे थोडा जरी चुकला तर त्याला प्रेमानं त्याची चूक सांगण्या ऐवजी ते त्याच्यावर ओरडतात, त्याला शिव्या देतात,अभद्र बोलतात.त्याऐवजी जर त्याने केलेल्या कामाबद्दल आधी छान कौतुक करून नंतर एकांतात त्याला चूक सांगितली तर तो खुशी खुशीत ती चूक सुधारण्यासाठी तयार होईल. आपण फक्त मुलांना दोष देत राहतो की तो बिघडला, ती चांगली वागत नाही; पण ते असं का वागतात याचा विचार केला कधी?...
ग.का.शेळके
९५०३७४९९६७

Comments
Post a Comment