कोरोना लॉकडाऊन
जन्म माणसाचा भेटला
पण मानवाने नाही केली कदर,
प्रदूषण तर करतच होता
पण कोरोनाचाही आणला कहर...
जहर खायला पैसे नव्हते
वरून लॉकडावून आले,
उधारीमध्ये दुकानदार
किमती वाढवू लागले,
सहकार्याची ची गरज आता
करायला पाहिजे मदत,
पण काही जणांची काही करून
हिंडण्याची सुटत नाही आदत...
माणसानेच केलं निर्माण
हे जगावेगळं संकट,
आता तरी सावध व्हारे
परिस्थिती होण्याआधी बिकट...
पूर्ण माहिती नसतानाही
मेसेज देतात पाठवून,
अफवा पसरवून टाकतात
सगळ्या देतात घाबरवून...
काही करतात रिकाम्या गोष्टी,
फालतू चर्चा घडवून,
नावं ठेवतात सरकारला,
नियम सारे तुडवून...
गोंधळ हा कोरोना चा
जाणार नाही लवकर,
कारण ऐकत नाहीत लोक
काही फिरत आहेत रस्त्यावर...
लॉकडाऊन चं करून समर्थन
घरीच थांबू आपण,
सोशल मीडिया तर्फे घेऊन ज्ञान,
करू माणुसकीचे सांत्वन..
- ग.का.शेळके
पण मानवाने नाही केली कदर,
प्रदूषण तर करतच होता
पण कोरोनाचाही आणला कहर...
जहर खायला पैसे नव्हते
वरून लॉकडावून आले,
उधारीमध्ये दुकानदार
किमती वाढवू लागले,
सहकार्याची ची गरज आता
करायला पाहिजे मदत,
पण काही जणांची काही करून
हिंडण्याची सुटत नाही आदत...
माणसानेच केलं निर्माण
हे जगावेगळं संकट,
आता तरी सावध व्हारे
परिस्थिती होण्याआधी बिकट...
पूर्ण माहिती नसतानाही
मेसेज देतात पाठवून,
अफवा पसरवून टाकतात
सगळ्या देतात घाबरवून...
काही करतात रिकाम्या गोष्टी,
फालतू चर्चा घडवून,
नावं ठेवतात सरकारला,
नियम सारे तुडवून...
गोंधळ हा कोरोना चा
जाणार नाही लवकर,
कारण ऐकत नाहीत लोक
काही फिरत आहेत रस्त्यावर...
लॉकडाऊन चं करून समर्थन
घरीच थांबू आपण,
सोशल मीडिया तर्फे घेऊन ज्ञान,
करू माणुसकीचे सांत्वन..
- ग.का.शेळके
Comments
Post a Comment