Posts

Showing posts from March, 2021

अशांना मुलगी देऊच नाही...

 #अशांना #मुली #देऊच #नाही... नसेल हाताशी काम काही, पोराचं लग्न लाऊच नाही, नसेल अक्कल मुलाला काही, चारित्र्य त्याचं सुंदर नाही, पोराचं लग्न लाऊच नाही, व्यसनात नेहमी डूबत राही, फालतू कामे करत राही, अशांसाठी मुली बघूच नाही, स्वतः चे निर्णय घेतच नाही, स्त्रियांना सम्मान देतच नाही , अपशब्द नेहमी तोंडी राही, अशांचे लग्न लाऊच नाही... जबाबदारी ची जाणीव नाही, आळस सगळा मनात राही, अशांना मुली देऊच नाही... मेहनत ज्याला जमत नाही, इमानदारी गमत च नाही, उगाच भांडण करत राही, वाईट संगतीत फिरत राही, अशांना मुली देऊच नाही... अशांना मुली देऊच नाही...            गणेश काशिनाथ शेळके,               २९/०३/२०२१

कठीण परिस्थिती

 माझं ठरलेलं आहे, जोपर्यंत स्वतः आर्थिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या जबाबदार बनत नाही. तोपर्यंत लग्नाच्या ध्यानी लागायचं नाही. हल्ली विचारांचे प्रवाह खूप च उलट्या दिशेने वाहतांना मी बघितले. सासू सुनांमध्ये छटाक छटाक गोष्टींवरून वाद होताना मी पाहिले. आजच्या आणि कालच्या पिढीतील विचारांचा हा विरोधाभास खूपच वाईट प्रभाव टाकत आहे असं मला प्रकर्षाने जाणवते आहे..जर समोरच्या येणाऱ्या पिढीला ही जुनी पिढी जुन्याच मापात धरून त्यांच्या मनासारखं वागण्यासाठी  अपेक्षा ठेवत असेल तर खूप अवघड आहे!...आणि येणारी नवीन पिढी म्हणजे सून ,जोपर्यंत स्वतः च्या मतलबाच्या पलीकडे विचार करणार नाहीत तोपर्यंत अनेक घटस्फोट, अनेक दुरावे, अनेक कुसंवाद  टाळता येणे जवळपास अशक्य होऊन जाईल... चुका कोण करत नाही?  मी तर खूप चुकतो. पण चुकल्यावर माफी मागून प्रेमानं एकमेकांना समजून घेणाऱ्या सास सुना बघायला भेटणं म्हणजे आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टी, ज्या हिने माझ्या मनासारख्या केल्या पाहिजेत, हिने समजून घेतलं पाहिजे, हिनेच लक्ष दिलं पाहिजे असे तोरे मिरवणाऱ्या बाया स्वतः च्याच हाताने मुलाचं आय...

बोला बोर झालं की काय करता?

 #तुम्हाला #बोर  #झालं कि तुम्ही #काय काय# #करता ???#       मी तर माहोल करतो !!! मी दिवसभर कस्टमर्स हॅन्डल करतो . त्यामध्ये बारा प्रकारचे बारा  माणसं  रोज भेटतात. त्यांच्या बारा प्रश्नांचे उत्तर बारा प्रकारे द्याव लागतं . हल्ली खूप ताणतणाव आहे इतकं कोरोना लॉक डाऊन च्या भानगडी मूळे सर्वांचं टेन्शन अजून वाढलं आहे . जीवनामध्ये आपण  रोज दैनंदिन कामे करून आपल्याला थकवा जाणवतो , तो थकवा घालवण्यासाठी अनेक मार्ग आपण अवलंबतो ; कोणी टीव्ही ला चिपकून बसते , कोणी बेड ला  तर कोणी फोन ला !! प्रत्येकाजवळ काही ना काही मनोरंजनाचे साधन असते . परंतु मित्रांनो आपल्याला असं एक साधन आवश्यक असतं  ज्यामुळं आपलं मानसिक आरोग्य समृद्ध झालं पाहिजे . टीव्ही वर चे सिरियल्स तसेच इतर कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो हे मी बऱ्याच  लोकांच्या निरीक्षणातून अनुभवलं.. कोणता कार्यक्रम बघायला हवा हेही तितकेच महत्वाचं असतं . माझं कसंय  ,मी दिवसभर कामातच इतका एन्जॉय करून घेतो कि मला जास्त थकवा जाणवतच नाही . घरी आलो कि मी थोडा फ्रेश होतो आणि  थोडा...

ONPASSIVE

 www.onpassive.com     By GKSHELKE Onpassive  एक आय टी क्षेत्राची कंपनी. काम :-  ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग साठी इंटरनेट सोल्युशन्स टूल्स बनवणे. म्हणजे बिजनेस ला अजून प्रभावी बनवण्यासाठी लागणारे मार्केटिंग टूल्स - जसे हिशोबासाठी o - ccounting, ई-मेल साठी - O- Mail,  पैसे ट्रान्सफर वगैरे साठी : O- Wallet, मिटींग्स साठी ; zoom प्रमाणे : O- connect , ऑनलाईन शिक्षण साठी ; O- ccademy... Etc.  इत्यादी असे 50 पेक्षाही जास्त आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन आणि सर्वात जबरदस्त टेक्नॉलॉजी चा वापर करून तयार केलेली सर्व प्रकारची ऑनलाईन डिजिटल प्रॉडक्ट्स Onpassive  कडे रेडी आहेत. हैदराबाद येथे onpassive चं मोठं चार पाच मजली हेड ऑफिस आहे जिथं आज जवळपास 700 हुन जास्त आय टी इंजिनियर्स, सायंटिस्टस तसेच तज्ञ लोक मोठ्या पगाराने काम करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी वर कुणाचंही कर्ज नाही.पूर्णपणे कर्जमुक्त असलेली onpassive ही जगातील सर्वात बेस्ट आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सर्वांसमोर एक आगळंवेगळं आणि अविश्वसनीय कमाई चं साधन देत आहे.मित्रांनो मी सुरु...