अशांना मुलगी देऊच नाही...
#अशांना #मुली #देऊच #नाही...
नसेल हाताशी काम काही,
पोराचं लग्न लाऊच नाही,
नसेल अक्कल मुलाला काही,
चारित्र्य त्याचं सुंदर नाही,
पोराचं लग्न लाऊच नाही,
व्यसनात नेहमी डूबत राही,
फालतू कामे करत राही,
अशांसाठी मुली बघूच नाही,
स्वतः चे निर्णय घेतच नाही,
स्त्रियांना सम्मान देतच नाही ,
अपशब्द नेहमी तोंडी राही,
अशांचे लग्न लाऊच नाही...
जबाबदारी ची जाणीव नाही,
आळस सगळा मनात राही,
अशांना मुली देऊच नाही...
मेहनत ज्याला जमत नाही,
इमानदारी गमत च नाही,
उगाच भांडण करत राही,
वाईट संगतीत फिरत राही,
अशांना मुली देऊच नाही...
अशांना मुली देऊच नाही...
गणेश काशिनाथ शेळके,
२९/०३/२०२१
Comments
Post a Comment