कठीण परिस्थिती
माझं ठरलेलं आहे, जोपर्यंत स्वतः आर्थिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या जबाबदार बनत नाही. तोपर्यंत लग्नाच्या ध्यानी लागायचं नाही. हल्ली विचारांचे प्रवाह खूप च उलट्या दिशेने वाहतांना मी बघितले. सासू सुनांमध्ये छटाक छटाक गोष्टींवरून वाद होताना मी पाहिले. आजच्या आणि कालच्या पिढीतील विचारांचा हा विरोधाभास खूपच वाईट प्रभाव टाकत आहे असं मला प्रकर्षाने जाणवते आहे..जर समोरच्या येणाऱ्या पिढीला ही जुनी पिढी जुन्याच मापात धरून त्यांच्या मनासारखं वागण्यासाठी अपेक्षा ठेवत असेल तर खूप अवघड आहे!...आणि येणारी नवीन पिढी म्हणजे सून ,जोपर्यंत स्वतः च्या मतलबाच्या पलीकडे विचार करणार नाहीत तोपर्यंत अनेक घटस्फोट, अनेक दुरावे, अनेक कुसंवाद टाळता येणे जवळपास अशक्य होऊन जाईल... चुका कोण करत नाही? मी तर खूप चुकतो. पण चुकल्यावर माफी मागून प्रेमानं एकमेकांना समजून घेणाऱ्या सास सुना बघायला भेटणं म्हणजे आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टी, ज्या हिने माझ्या मनासारख्या केल्या पाहिजेत, हिने समजून घेतलं पाहिजे, हिनेच लक्ष दिलं पाहिजे असे तोरे मिरवणाऱ्या बाया स्वतः च्याच हाताने मुलाचं आयुष्य खराब करून टाकतात. माझा एक सल्ला आहे, जर तुमचं पोरगं सध्या जबाबदारी घेण्याच्या स्थिती मध्ये नसेल तर फालतू त्याचं लग्न दुसऱ्या जीवाशी लावून तिच्या आयुष्याचा नासाडा करू नका.....काही फरक पडत नाही लग्न लावून मुलं सुधारत नाहीत आजकालची.प्रत्येक सून समजूतदार निघेलच असं थोडीच आहे? ..कोण कसे निघेल कोणाला माहीत? आणि समोरच्याने आपल्याला समजून घेतलं पाहिजे ही अपेक्षाच ठेवली नाही पाहिजे! मनासारखं नाही झालं की उगाच मनाला नेहमी ती गोष्ट बोचत राहते... माझं स्वतःचं मत आहे, जर मीच स्वतः व्यवस्थित समजून घेणारा नसेल तर समोरच्या येणाऱ्या जीवाला काय समजून घेणार? पैसाच सर्वकाही नसतो ,पण पैशांशीवाय पानही हालत नाही हेही तितकेच खरे!.. मनाला जपणारा जोडीदार भेटायला नशीब नसते लागत, तसे वागावे लागते. जो भेटला त्याला गोड मानून संसाराची गाडी ढकलत येणाऱ्या जुन्या बायांना त्यांच्या त्या गोष्टीचा जास्तच अभिमान वाटतो असंही कधी कधी त्यांच्या वागण्यातून जाणवते. पण बयाहो, आजकालच्या पोरी नसतात एवढ्या तत्पर...त्यांना सर्व कळते पण वळायला सुरुवातीची 3 ते 4 वर्षे लागत असतात. लग्न म्हणजे पोरखेळ नसतोच. खूप मोठी कसरत असते.आपल्याला अमक्याच नवरा भेटला, अमकी च बायको भेटली, अमकी च सासू भेटली म्हणत अश्रू गाळण्यात च हल्लीची काही अंशी पिढी वेळ घालवतांना दिसत आहे... हो आमचं अजून लग्न झालं नाही, म्हणून आम्हाला जास्त कळत नसेल ,पण निरीक्षणातून ही शिकता येते.आज तुम्ही जसे आगाऊ वागसाल ,तुमची येणारी पिढी त्याहूनही आगाऊ निघणार.कारण जसे पेराल तसे उगवेल हे प्रत्येक काळात लागू होतेच...मोठ्या माणसांना उपदेश करून लहान तोंडी मोठा घास घेण्याची आपली हिंमत नाही, म्हणून असं पोस्ट द्वारे थोडं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. जर लागू झालं तर विचार नक्की करा की आपण कुठं चुकत आहोत. किती समजून घेत आहोत एकमेकांना? आपलं वागणं आपल्या कुटुंबाला कोणत्या वळणावर नेऊन सोडत आहे? आपल्या वागण्याचा समोरच्या पिढीवर चांगला परिणाम होत असेल का?.....
आपलाच ,
गणेश शेळके
www.gkshelke.blogspot.com
Comments
Post a Comment