बोला बोर झालं की काय करता?

 #तुम्हाला #बोर  #झालं कि तुम्ही #काय काय# #करता ???#

      मी तर माहोल करतो !!! मी दिवसभर कस्टमर्स हॅन्डल करतो . त्यामध्ये बारा प्रकारचे बारा  माणसं  रोज भेटतात. त्यांच्या बारा प्रश्नांचे उत्तर बारा प्रकारे द्याव लागतं . हल्ली खूप ताणतणाव आहे इतकं कोरोना लॉक डाऊन च्या भानगडी मूळे सर्वांचं टेन्शन अजून वाढलं आहे . जीवनामध्ये आपण 

रोज दैनंदिन कामे करून आपल्याला थकवा जाणवतो , तो थकवा घालवण्यासाठी अनेक मार्ग आपण अवलंबतो ; कोणी टीव्ही ला चिपकून बसते , कोणी बेड ला  तर कोणी फोन ला !! प्रत्येकाजवळ काही ना काही मनोरंजनाचे साधन असते . परंतु मित्रांनो आपल्याला असं एक साधन आवश्यक असतं  ज्यामुळं आपलं मानसिक आरोग्य समृद्ध झालं पाहिजे . टीव्ही वर चे सिरियल्स तसेच इतर कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो हे मी बऱ्याच  लोकांच्या निरीक्षणातून अनुभवलं.. कोणता कार्यक्रम बघायला हवा हेही तितकेच महत्वाचं असतं . माझं कसंय  ,मी दिवसभर कामातच इतका एन्जॉय करून घेतो कि मला जास्त थकवा जाणवतच नाही . घरी आलो कि मी थोडा फ्रेश होतो आणि  थोडा वेळ बेड  वर शांत चित्ताने दिवसभर केलेल्या चांगल्या वाईट कामांचं चिंतन करतो . त्यामुळं मन स्थिर होण्यास मदत होते . युट्युब ला जबरदस्त नॉलेज चा खजिना आहे  , त्यातील सुंदर शिकवण देणाऱ्या सद्गुरुंचे कार्यक्रम हल्ली मी जास्त ऐकतो ज्यातून मला खूप आनंद  मिळतो . ज्या गोष्टींमुळं माणसाचं मन  नवीन नवीन अपडेट घेते ते बघायला मला आवडतं . आज मी जसा आहे तसा उद्या राहणार नाही . मी स्वतःला रोज एक एक नवीन विचार घेऊन अपडेट करतो . माझ्या २५ वर्षांच्या या वयात मला पुढं अजून बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागणार हे निश्चित आहे म्हणून मी स्वतःला मनातून मजबूत कसं  करता येईल ह्यावर फोकस ठेवतो आहे . मी मन शांत करण्यासाठी गाण्यांचे रिऍलिटी शोज बघणं पसंद करतो . त्यातुन खूप प्रेरणा मिळते . किती टॅलेंट आहे जगात त्याची प्रचिती येते !! आणखी वैज्ञानिक जगतात काय काय चालू आहे ते व्हिडियो सर्च करतो . किशोर कुमार यांच्या रोज तीन गाण्यांनी माझी दिवसाची सुरुवात होते . हल्ली मी जास्त मुव्हीज बघत नाही . कारण माझ्या लाईफ मध्ये onpassive  आले आहे . आता मी तेच बघतो ज्यामुळे पैसे कसे येतील ते समजेल . onpassive  बद्दल माहिती साठी www.onpassive.com वर जाऊन सगळं समजेल . असो तर टेन्शन घालवण्यासाठी बहुतेक लोक घरी टीव्ही बघतात . काही दारू पिऊन टेन्शन घालवतात असं मला बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटलं . माझ्या मते टेन्शन ला आपण टेन्शन समजत राहतो म्हणून ते आपल्याला अवघड जातं . खरे तर जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी माणसाच्या मनाला त्याची इच्छा नसल्यास  टेन्शन देईल . आपलं मन हे आपल्या कंट्रोल मध्ये असणं  महत्वाचं असतं ....

   {उर्वरित नंतर लिहतो . अर्जंट काम आलं ..... }


        G.K.SHELKE 

www.gkshelke.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे ..... (भाग ८)

लग्न म्हणजे... (भाग १)

बड़ी अच्छी है तनहाई...!