15 .01.2018
तू चिंता नकोस ग करु आई मी घेईन काळजी रोज माझी. आता मी मोठा झालोय न.पण तरी तुझ्यासाठी मी आजही छोटा बच्चाच आहे.31 डिसेंबर च्या दिवशी मला call करून" काळजी घे आज " असं तू बोलली..आई तुला माहीत आहे तुझं हे लेकरू इतके समजदार झालय की योग्य अयोग्य बरोबर ओळखू शकतं...त्यामुळं तू अजिबात चिंता करू नकोस...तू दिलेले सर्दी खौकल्याच औषध आणि मधाची बाटली मी रोज थोडी थोडी घेतो ह...रोज फोन वर तू विचारत असतेस की माझी तब्बेत कशी आहे ते..पण.......आई कधी तू स्वतःची तब्बेत कशी आहे ते खरं खरं सांगत नाहीस..तू मला कमज़ोर पडू देऊ इच्छित नाहीस हेही मला माहीत आहे...पण तू अजिबात काळजी करू नकोस आई !तुझा हा बछड़ा आता शेर झाला आहे.त्याच्यात परिस्थितीनुसार खूप परिवर्तन आले आहे.म्हणून कोणतीही परिस्थिती हाताळण मला जमाय्ला लागल आहे..
आई तू सौसलेल्या काबाडकष्टाची छबी आजही माझ्या मनात आहे आणि मला त्याची जाणीवही आहे...मी कधीच तुझ्या नावाला खराब होऊ देणार नाही...आई ,आपली परिस्थिती चांगली नसतानाही तू माझ्यामागे खंबीरपणे उभे राहून तू मला शिक्षण घ्यायला पाठिंबा देताहेस....माझ्या कामाच्या पैशातूनही तू काही अपेक्षा ठेवत नाहीस...शाळेत असतांना अगदी माझ्या कोणत्याही गरजेला पूर्ण करण्यासाठी तू लोकांकडून दिढिने पैसे आणून द्यायचीस..तेव्हा मनाला खूप लागायचे आई....तुला खूप त्रास सहन करावा लागतो आमच्यासाठी...आई किती ग राब राब राबतेस तू ?...दिवसभर भर उन्हात घाम गाळतेस आणि संध्याकाळी दमेल भागेल असूनही मला न विसरता call करून माझी खुशालि वीचारतेस......कसं ग फेडु हे ऋण तुझं मी ?...लहान पणापासून तुझ्या वाटेला आलाय फक्त आणि फक्त संघर्ष !..स्वतः पायाच्या वेदनेने .तडफडत राहूनही तू माझा विचार आधी करतेस....फोन वर माझा आवाज बदलला की मला काय अडचण वगैरे आहे हे तुला बरोबर कळतं....शेवटी आई ती आईच असते..तिची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही...आई मी काही देव बीव मानत नाही !आणि देव जर मानायचाच असेल तर तुलाच मी माझा देव मानतो...तू 80-100 रु रौजाने कामं करून आमची आणि अख्या घराची जबाबदारी आजपर्यंत पार पाडत आलीस...तुझासारखी आई फक्त तूच असशील या जगात..आपले दुःख लपवून दू आपल्या लेखरांना सुखी बघण्याचे स्वप्नं बघतेस...किती ग महान तू आई...खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर ,तू शिकवलेल्या गोष्टीवर...आई मी तुझं नाव मोठं करण्यासाठीच तुझ्यापासून दूर आलोय...
ही दुनिया खूप भयानक आहे आई !मी घराबाहेर पडलो तेव्हा मला खूप गोष्टी शिकायला भेटत आहेत.मी वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत राहतो.चुकीच्या गोष्टी मला सहन होत नाहीत हे तुला माहीत आहे म्हणून मी कुठहि असो तरी तुला माझ्या रागाची कल्पना असतेच..पण काळजी करू नकोस मला.माझा राग आवरायला खूप गोष्टी मिळाल्या आहेत..माझा अभ्यासही छान सुरू आहे..कामावरून परतायला खूप उशीर होतो. पण दिवसभर गाणी गात गात ,डायलॉगबाजी करत वेळ कसा निघून जातो कळतच नाही....! बाकी मी मजेत आहे.तू काळजी घेत जा...
तुझा
"गणूं.."
Comments
Post a Comment