लबाड हे मन....

लबाड हे मन कुठच्या कुठं फिरतं,
कधी मोकळं हसतं तर कधी दुःखानं झुरतं,

मेंदू सांगतो एक अन हे भलतंच काही करतं,
लबाड हे मन कुठच्या कुठं फिरतं...

मन म्हणतं ऐक माझं मीच खरं सांगतो,
पण मेंदू मग मधामधात चमचा फिरवतो

क्षणात इकडं क्षणात तिकडं असं हे पळतं,
लबाड हे मन कुठच्या कुठं फिरतं...

चंचल हे मन उड्या मारत राहतं,
नको त्या गोष्टीच्या खोलात डोकावू पाहतं,

विचित्र आहे एक गोष्ट जी आहे अस्पष्ट,
मेंदू जर आहे डोक्यात, तर मन नेमकं कुठं असतं...?

     गणेश शेळके

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!