#कडू_बोलतो_पण_खरं_बोलतो...
...
खूप विचार विमर्श केल्यानंतर आणि सत्यपरिस्थिती लक्षात घेतल्यानंतर विचार करावा की सख्खी आई जर चुकीचे वागत असली आणि बायको ची चुकी नाही हे समजलं तर तुम्ही काय कराल ?....मी असे अनेक जिवंत उदाहरण बघून पोस्ट करतोय......माझ्या लाईफ मध्ये मी आजपर्यंत कधीच चुकीच्या माणसाला सपोर्ट केला नाही आणि त्याचा लाडही केला नाही. मग तो आपला सक्का बाप किंवा कोणताही नातेवाईक असो त्याने केलेली चुकी जर मोठी असेल तर मी अजिबात आदर करू शकत नाही. मग भलेही माझ्यावर कुणी कितीही उपकार केलेले असोत....आपल्या मुलींना आपण इतक्या लाडणं वागवतो पण परक्या घरून आलेल्या सुनेला अशी वागणूक द्यायची ? कशाचाही ताण तिच्यावरच काढायचा? वा रे वा घनचक्कर साले!!...जर भविष्यात माझी आई अशी वागली आजचं हे बोलणं माझ्या कृतीत उतरवायला मला अजिबात वेळ लागणार नाही... सासू आणि सुनेच्या वादात पडू नाही असं म्हणतात ते बरोबर आहे..पण जर त्या दोघींच्या भांडणाचा वाईट परिणाम त्याच्यावर ,त्याच्या मुलांवर होत असेल तर काय त्याने चुपच राहायला पाहिजे?आणि समजा त्यांना सावरण्यासाठी वेळ देऊनही त्या सुधारत नसल्या तरी काय आपण तो गोंधळ पाहतच राहायचा ,काहीच बोलायचं नाही ?म्हणजे आपली त्याबाबत काहीच जबाबदारी नाही? बरोबर आहे म्हणा, कोणयाही एकीला सपोर्ट केला तर दुसरी नक्कीच मनावर घेणार ,म्हणून शक्य झाल्यास त्यांच्या मधात पडायचाच विषय नाही...असाच त्यांचा उपद्व्याप सहन करत बसायचं...
बहिणीचं लग्न लवकर झालं किंवा लावलं गेलं या गोष्टींचा आजही भयंकर राग आहे...ज्या वयात मुलीला बोलण्या वागण्याची पद्धत शिकायला वेळ लागणार होता त्याच वयात तुम्ही जर तिचं लग्न लावून देता ?....हो काही पोरींमूळ बाकीच्या पोरीही बदनाम होतात आणि त्यांनि असं काही केलं तर? या धाकापायी त्यांचं सावधान विश्राम केलं जातं...
अशा कितीतरी माझ्या बहिणीना त्यांच्या इच्छांची होळी करून जन्मभराच्या कैदेत टाकलं जातं...आज न उद्या आपलं लग्न होणार या गोष्टींचं ग्यान असणाऱ्या काही मुली तर खूप शिकण्याच स्वप्नच बघत नाहीत .....बस दहावी झाली ,बारावी झाली की लग्न ठरतं..त्या त्यांच्या घरी अन आपण आपल्या घरी मोकळं....
खूप मुलींची इच्छा असते पुढं शिकण्याची ,मोकळं जगण्याची ....पण शेवटी मुलगी असण्याचा तोटा...मग या विषयात काय बोलावं?...कारण सगळ्याच मुलींना पुढं शिकून मोठं होण्याचं स्वप्न पडत नाही आणि सगळ्याच मुलींना इतक्या लवकर सासुरवास करायला जाणं जड जात नाही...उरतात तर बस काही अंशी मुली ज्यांना शिकून मोठं व्हावंसं वाटतं...खरंच पण मुलींचं जगणं कसंय देवा...मुलींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करणाऱ्या माय बापांना माझा सलाम....!
( फ्रेंड्स मी जरी हे लिहलं असेल तरी असं चालते समजा की "हीच परिस्थिती असली तर त्या परिस्थितीत मी काय केलं पाहिजे?" या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या शब्दांत दिलं आहे..आता यावर सगळ्यांची प्रतिक्रिया सारखी राहू शकणार नाही.ज्याचा त्याचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा राहणार . पण मला तरी वाटतं की बायको आणि आई यापेक्षा कोण योग्य आणि कोण अयोग्य यानुसार न्याय व्हायला पाहिजे... आपण काही न्यायाधीश नाही म्हणा त्यांच्यातला, पण आपण कोणीतरी लागतो न त्यांचा ? बाहेर कोणीही विचारणारच ,की तुम्ही असतांना तुमच्या घरी असं घडतं?.... ग्रुप मध्ये अनेक सासुसुद्धा असतीलच पण इथं प्रश्न कुण्या नात्याचा नाही तर योग्य अयोग्याचा आहे ,अन्यायाचा आहे ,एका विशिष्ट परिस्थितीचा आहे... )
गणेश काशिनाथ शेळके.
Comments
Post a Comment