खेड्यातली छकुली...(विनोदी कविता)

#खेड्यातली_छकुली_कलेजिला_गेली...!
(कृपया कुणाला लागू होत असेल तर मनाला लावून घेऊ नये .)

खेड्यातली छकुली कलेजिला गेली,
अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...!

मोट्या मोट्या शरांची मोटी मोटी थाठं,
अन कार्टी आता लागली झोपू वाजेपर्यंत आठं...!
अन खेड्यातल्या श्येडुल ची तिनं तं कत्तल च केली ,
अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...!

हुशार व्हती पोट्टी माही माय बाई खूपं,
लावून खायची पोळीले लोणी अन तूपं,
पण शरात जाऊन तिनं तं डायटिंग सुरू केली ,
अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...!

खेड्यात व्हती माय, तवा चांगली व्हती बाडी ,
पर डायटिंगमुळं झाली साऱ्या अंगाचीच काडी माय अंगाचीच काडी ...
अन लम्या-लम्या केसांची तिनं त कटिंगच केली ,
अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...!

खेड्यामधी माही शकू शांतच राहत होती ,
अन तिथं जाऊन पाह्यलं तं गप्या मारत व्हती माय गप्या मारत व्हती ..!
अन मोकया चाकया कपल्याची तिनं त फिटिंगच केली ,
अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...!

इग्नोर केली तिनं माय स्टडी आणि रायटिंग ,
अन आवडू लागली तिले बाई पिच्चर मधली फायटिंग ...!
माय कलियुगाच्या वाऱ्यानं ती झपाटून गेली ,
अन भेटीले गेली माय ओयखु नाय आली माय ओयखु नाय आली...!

       -( गणेश शेळके)

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!