बालपणापासून सोबत असलेले माझे मित्र मला कधी कधी भेटतात तेंव्हा खूप आनंद होतो ,पण....ज्यावेळी असाच बोलता बोलता माझा तो प्रिय मित्र खिशातुन गुटख्या ची पुडि काढतो किवा तंबाकू काढतो तेंव्हा आपली मैत्री हरल्यासारखंच दुःख होतं......जे मित्र कधीच व्यसन करत नव्हते ते आज भेटतात तर खिशात पुड्या घेऊन...!...माझी हीच मित्रमंडळी महाराजांच्या किंवा ,बाबासाहेबांच्या नावाचा रुबाब मीरवतात त्यावेळी मात्र तळपायाची आग मस्तकात जाते....! जो मित्र कधी काळी आपला सर्वात जवळचा वाटायचा तो या गोष्टीमुळे नको नकोसा वाटू लागतो....काही विचारले तर साले नुसतं परिस्थितीचे कारण पुढं करतात आणि "तुला नाय कळणार.." असं म्हणून गप्प करतात... सालं यापेक्षा आणखी वाईट गोष्ट कुठली असणार एका खऱ्या मित्रासाठी?...काय चुकी आहे त्यांच्या आय बापांचि ?....काय खरंच टेन्शन आल्यावर फक्त व्यसन हाच योग्य मार्ग भेटतो यांना ?...
Gkshelke..
Gkshelke..
Comments
Post a Comment