मी असाच आहे आणि असाच राहणार..
मला प्रसिद्धी नको .मला जे पटतं त्याला समर्थन आणि जे नाय पटत त्याचा विरोध करावासा वाटतो म्हणून लिहतो. मग त्यात कधीकधी भाषा बदलत राहते, पण मला फरक पडत नाही . कुणी वाचावं आणि शाबासकी द्यावी यासाठी नाही लिहीत मी. लिहून पोस्ट केल्यावर माझं मन हलकं होतं आणि मी मोकळ्या मनानं अभ्यास करू शकतो . पण समाजात चालणाऱ्या वाईट गोष्टींचा राग येतो , अन्याय बघवत नाही , म्हणून सालं मनाला वाटतं की अजून दोन चार लोकांना माझ्यासारखा अनुभव आला पाहिजे ,त्यांनाही जाणीव झाली पाहिजे म्हणून लिहितो .माझ्याकडं जास्त शब्दसंपदा नाही कारण मी जास्त वाचत नाही . मी जास्त वाचत नाही म्हणून राजकीय पोस्ट्स करत नाही.लिहिण्यासाठी ज्ञान असावं लागतं.. पण काही गोष्टी निरीक्षणातून तसेच अनुभवातून लिहू शकतो म्हणून लिहितो..मी मनाची भाषा वापरतो .मला संदर्भासहित स्पष्टीकरण करून लिहिण्यात काही रस नाही .अलंकारिक भाषा मी कमीच वापरतो . कुणी माझी पोस्ट वाचावं आणि मला like comments द्याव्यात अशी अपेक्षा मी बाळगत नाही.(पूर्वी वाटायचं पन आता नाही .)मी post नुसार फोटो टाकत नाही , मी कधी कधी वेगळी भाषा वापरतो जी लोकांना रुचत नाही ,माझ्या वाचनात कमी असल्याची जाणीव अनेकांना होते ,या सर्व गोष्टींची मला पूर्णपणे जाणीव आहे . पण मला काही लेखक व्हावं म्हणून लिहावयास वाटतच नाही तर मी का या गोष्टींची पर्वा करू लागलो ?..ज्या दिवशी लेखक होण्याची इच्छा होईल तेव्हापासून माझ्या पोस्ट्स वेगळं रूप धारण करतील . तोपर्यंत सहन करतील मित्र माझे .
आपला GK
बरोबर ना
ReplyDelete