टीकेला टिका...

टीका करणारे खूप आणि टीकेला टिकणारे कमी असे झाले आहे.. जो टीकेला टिकला समजायचं तो जिंकला!...कसंय की आयुष्यात काही लोक शिव्याशाप देतात ,तर काही लोकं प्रोत्साहन, प्रशंसा करतात.खरंतर दोन्ही प्रकारचे लोकं आपल्या आयुष्यात समान भूमिका पार पाडत असतात .खऱ्या अर्थाने ते आपल्याला धडा, बोध देत असतात.पण आपलं मन म्हणतं,"शिव्या देणारे लोक आपल्या आयुष्यात येऊच नयेत ." खरंतर या जगात बोध घेण्यासाठी सर्व तऱ्हेचे लोकं आणि घटना महत्वपूर्ण आहेत.कोणी आपल्याला ताणें मारतो म्हणूनच तर आपण आपल्या प्रगतीची गती अजून वाढवतो. हा सगळा मानसिक खेळ आहे ,जो ज्याला समजला तो टीकेला बळी पडत नाही.आपल्याला जेपण बरवाईट ऐकायला भेटतं ,ते खरंतर आपल्या भल्यासाठीच नियतीनं केलेलं असतं...कुणाचं आपल्या आयुष्यात येणं आणि अगदी जिवाभावाच्या सोबतीचं आपल्याला सोडून दूर जाणं यात आपलं शुभच चितलेलं असतं.कुणाला जर परीक्षेत अपयश आलं तर तेही त्याला काहीतरी हेतूनं नियती देत असते...ज्याला खूप कष्ट करूनही काहीच भेटत नाही ,त्यामागही काहीतरी विशेष संदेश दडलेला असतो..थोडक्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही...खास तरुण वर्गाने ह्या विचारसरणीने कार्यरत राहिलं तर काहीतरी लाभ नक्कीच होऊ शकेल असं मला वाटतं....आजवर आपला जितका उत्कर्ष झालाय, तो बहुतेकवेळा नकारात्मक भासणारे लोक आणि घटना यांमुळेच झाला आहे, हे शोध घेतल्यानंतरच समजू शकेल.
     'माझ्या दुःखाचे कारण कोणी इतरच लोक आहेत,' असं आधी आपल्याला वाटायचं.परंतु त्यावेळी आपली दृष्टी केवळ नकारात्मक बाबीच पाहत असल्याने आपल्याला वेळोवेळी तीच दृश्य दिसत होती. ही गोष्ट शोध घेतल्यानेच आपल्याला समजू शकते.ही मोठी मजेशीर बाब आहे.मनुष्य जेव्हा घडणाऱ्या प्रसंगातून काही बोध घेत नाही ,तोपर्यंत त्याच्या आयुष्यात असे लोक येतच राहतात, जे त्याला जीवनाचा धडा शिकवतील.नेहमी लक्षात असू द्यावं, की ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं सारखी नसतात त्याचप्रमाणे माणसंही सारख्या स्वभावाची नसतात...सगळेच जर आपल्याला समजून घेणारे असले तर टीका कोण करणार?आणि टीका नसेल तर आपलं मानसिक बळ कसं प्रोत्सावणार ? म्हणून प्रत्येकाच्या जीवनात काही साथ देणारे ,तर काही ताणें मारणारे असलेच पाहिजेत.तरच जगण्याची खरी मजा आहे.ज्याला वाटतं की कोणीही आपल्या ला समजून घेत नाही ,त्यानं थोडं संयमाने रहावं आणि शांत विचार करून स्वतः ला विचारावं ,"तू तरी आजपर्यंत स्वतः ला नीट समजू शकला का ?……" जे उत्तर भेटेल ते नक्कीच समाधान देणारं राहील... दुःखाचे दिवस जास्त काळ राहू शकत नाहीत, आणि दुःखाशिवाय तर सुखाची किंमत कळू शकणारही नाही.
   Positive Thinker GK...

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!