चुकी माझीच होती ......




पाणचट गोष्टीला महत्व दिलं,
रिकाम्या भावनांना जवळ केलं,
मनात फक्त तिलाच घेतलं,
जे करायचं नव्हतं तेच मी केलं.....

चुकी माझीच की मी तिच्यात गुंतून  गेलो,
तिच्याच विचारात हरपून गेलो,

नको म्हटलं तरी तिच्यावर प्रेम केलं,
भलतंच बेंनं पदरात पडलं

उशिराच समजलं घोडचूक झाली ,
चुकीच्या मुलीची निवड केली,

बघता बघता  एक अक्ख
 वर्ष गेलं ,
पण माझं मन तिला अजून
 नाय कळलं...

प्रेम नव्हतं पाहिजे मला
 बस खास मैत्री हवी होती,
ती समजून घेईल मला
 अशी पक्की खात्री होती...

पण माझ्या खात्रीला 
 तिनं कात्री लावली,
प्रपोजरुपी नवसाला ती नाय पावली...


         गणेश शेळके

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!