कलियुगाचं गीत...
सांगतो खरं ऐका बरं,
कलियुगाचं उलटलं वारं...
आई म्हणती बाली,
बाली शाळेला गेली,
अन कोणत्या तरी पोटयासोबत
सिनेमा पाहून आली !
गोविंदाचा फोटो
तिनं हातात आणला,
अन घरी येऊन आरशात पाहून
तोंडाले लावला !
व्हाट्सआप फेसबुक ट्विटर चा
ह्यो भलताच जमाना,
अन प्रत्येक गल्लीत
सापडतोया बेरोजगार दिवाना !
हल्लीच्या या जनरेशनला
'याड' हे लागलं,
अन सैराट मधून पोरांनी मग
भलतंच काही घेतलं !...
दारू तंबाकू एसणापाई
बरबाद झाली घरं,
अन गावच्या टपरिवरती
दिसू लागली पोरं..!
दगडधोंड्यांना पुजून पुजून
करतात दान- धर्म,
अन मानवतेला धोका देऊन
करतात वाईट कर्म !...
माय-बापं घाम गाळून
पोरांले शिकवतात,
अन पोरं मात्र मान त्यांना
खाली घालायला लावतात !....
वाईट लोकांना हे लोकं
लवकर जवळ करतात,
अन चांगल्याना मात्र
येड्यामध्ये काढतात !..…
इमोशनल होऊन भावनात वाहून
निर्णय हे चुकतात,
अन येळ निघून गेल्यावर
मग रडत ते बसतात !...
सांगतो खरं ऐका बरं,
कलियुगाचं उलटलं वारं...!
- ग.का.शेळके
Comments
Post a Comment