समजलं तर बघा...

जीवनात सर्वकाही जागीच भेटत नाही.त्यासाठी हातपाय हलवावे लागतात...म्हणजे मेहनत करावी लागते.. थोडंस समजदार झाल्यावर जबाबदारी ची जाणीव मनाला स्वस्थ बसू देत नाही..वेळेचं बंधन माणसाला हवं ते लवकर मिळू देत नाही..सतत मनाला कुटुंबाचं भरणपोषण कसं करायचं या प्रश्नांना सामोरं जावंच लागतं...महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थोडं कर्ज घेतलं आणि ते परत करण्यास आपण तात्पुरते असमर्थ ठरलो ,तर आपल्याच मनाची काहिली काहिली होते...काही निर्णय हे प्रॅक्टिकली विचार करूनच घ्यायला हवेत. ते जर मनाने घेतले तर कधी कधी त्यावर पश्चातापही करावा लागतो...संकटं तर कधी कधी पाचवीलाच पुजलेली वाटू लागतात..कठीण परिस्थितीमध्ये कोणी देवासारखा धावून येतं तेव्हा सर्वकाही ठीक होईल अशी उमेद सुरू होते...आशा, अपेक्षा अन महत्वाकांक्षा माणसाला सुखाने जगू देतच नाहीत...सतत नवनवीन मोहमायास सामोरे जावे लागते...उत्पन्न वाढले की गरजांची संख्याही वाढू लागते..कमी पैशात सुखाचे जीवन जगणाऱ्या कुटुंबात उत्पन्न वाढल्यावर बचतीचे प्रयत्न वाढल्यास त्यांचं भवितव्य सुंदर बनते..आयुष्य किती जगता येईल हे कोणीच सांगू शकणार नाही.पण त्याला किती सुंदर बनवता येईल हे आपलं आपल्यालाच ठरवता येईल...


       Gk....

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!