मोबाईल...
चार तारखेलाच मी अँड्रॉइड 4g फोन घेतला. तशी मला त्याची खूप गरज होती. आधीचा फोन 3g होता त्यामुळे हा बदलण्यासाठी माझा प्रयत्न चालू होता. फोन जवळ येण्याआधी मला वाटायचं अमुक अमुक करू तमुक तमुक करू परंतु नंतर मात्र फोन घेतल्यानंतर काहीच सुचेनासे झाले. कारण या अँड्रॉइड फोर जी फोन मध्ये काय कराव आणि काय नाही हे सहज समजणे खूप कठीण आहे. प्रथमतः फोरजी नेटवर्क चा आनंद घेत होतो मात्र त्या आनंदाच्या भरात आपला बहुमोल वेळ वाया जाऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल अशी जाणीव निर्माण होत आहे. कारण ज्या कामासाठी फोन घेतला ते काम मागे पडत आहे आणि विनाकारण च्या मनोरंजना मध्ये जीव गुंतत आहे. दोन-तीन दिवसापासून याच विचारांमुळे गंभीर होतो नंतर मात्र वाटू लागलं की थोडं नियंत्रण आवश्यक आहे. बहुधा जवळपास 80 टक्के लोकांकडे तरी आज फोरजी फोन आला असेल आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांची तो फोन घेण्याची उत्कट इच्छा असेल. परंतु हल्ली ज्यांना गरज नसते त्यांच्याकडेच जास्तीत जास्त फोन्स उपलब्ध असल्याचे दिसून येते. येऊन जाऊन लहान लहान पोरं पोरी टिक टोक नावाचे ॲप्स वर एन्जॉय करताना दिसत मग बाकीचा वेळ ते व्हाट्सअप वर घालू शकतात. परंतु मोबाईलचा उपयोग वाढल्यामुळे अभ्यासावरुन त्यांचा दुर्लक्ष होताना दिसत आहे.महाग फोन घेऊन ज्यांना गरज नाही असे लोक आपली प्रतिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करतात. काहींचे भारी भारी फोन हे तीन चार पाच वर्षांच्या लहान मुलान जवळच पडलेली दिसतात. त्या मोबाईलचा लहान मुलांच्या लहान मेंदूवर केवढा भीषण परिणाम होऊ शकतो याचा विचार देखील कोणी करत नाही आणि केलाच तर त्या गोष्टीला जास्त गांभीर्य दिले जात नाही.... आमच्या गल्लीमध्ये अशी तीन चार उदाहरणे आहेत. मुलांना संभाळण्यासाठी म्हणजेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना उन्हात जाऊ देऊ नये यासाठी त्यांच्या हातामध्ये युट्युब किंवा नेट चालू करून फोन दिले जातात. मुलं त्यामुळे रमतील असे त्यांना वाटते परंतु त्या मनोरंजनाचा सरळ परिणाम त्या चिमुकल्यांच्या मेंदूवर आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनावर होत असतो. लहान मुलांचा तर समजतं, त्यांना तेवढी समजण्या इतकी बुद्धी विकसित झालेली नसते. पण त्यांच्या आई-वडिलांनी आपली जबाबदारी अशा पद्धतीने पार पाडणे योग्य नसते असे मला वाटते. ज्यांना कामाची सुट्टी आहे किंवा ज्यांच्याकडे कामच नाही ते सगळे आणि मी सुद्धा मोबाईल मध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतो. मोबाईल मध्ये डाटा असेपर्यंत सगळेजण मनोरंजन करतात आणि डाटा संपल्यावर गावात जाऊन मित्रांना भेटतात असा अनेक वेळा अनुभव आलेला आहे. ज्यांना नोकरी लागलेली आहे त्यांचं ठीक आहे परंतु जे अजूनही नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी मात्र मोबाईलचे वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे असेच मला वाटते. कालपर्यंत जे झालं ते झालं परंतु आता पुढे मोबाईलच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवून आहे.
. एकांतामध्ये एकटेपणा घालवण्यासाठी अनेक जण मोबाईलचा आधार घेत असतात. मोबाईल म्हणजेच त्यांचा खूप जवळचा मित्र असं त्यांना वाटतं. आणि काही अंशी ते बरोबर ही असतं. कारण मोबाईल हे यंत्र माणसाला ज्ञान मिळवून देऊ शकते आणि त्याच्या वाचनासाठी विविध साहित्य उपलब्ध करून देऊ शकते. मोबाईल चे फायदे जितके जास्त तेवढेच त्याचे तोटे सुद्धा दिसून येतात. परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतातच हे आपण विसरता कामा नये. याच विचारांमुळे मोबाईल ला दुधारी तलवार असे सुद्धा म्हणता येते. आजची पिढी ही मोबाईलच्या इतक्या नादाला लागलेली आहे की दहापैकी सात माणसं तरी मोबाईल मध्ये डोकावलेले दिसून येत असतात... पहिली ते दहावी बारावी पर्यंतच्या मुला-मुलींना आज भारी भारी स्मार्टफोन्स दिले जात आहेत. मला सांगा यांना काय गरज आहे स्मार्टफोनची? मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी करता येतो मात्र जर पुस्तके उपलब्ध असतील नोट्स उपलब्ध असतील तर कशासाठी पाहिजे आपल्याला मोबाईल? ग्रॅज्युएशनच्या लेव्हल वर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्तरावर आपल्याला मोबाईलचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागतो कारण त्या विषयांची नोट्स उपलब्ध असेलच असे नसते. त्या नोट्स इंटरनेटच्या माध्यमाने एकत्रित संकलित करावी लागतात. परंतु दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या मोबाईलची आवश्यकता नसते. परंतु मुलंही अनुकरण वादी असतात ते मोठ्या व्यक्तींची गोष्टींचे अनुकरण करतात. त्यांच्याजवळ मोठे स्मार्टफोन बघून त्यांनाही ते फोन खेळण्याचा उत्साह निर्माण होतो आणि त्यासाठी ते हट्ट करू लागतात. आता तो हट्ट पुरवायचा की त्यांना नकार द्यायचा हे पालकांच्या हातात असते. लहान मुल मोबाईल साठी रडू लागल्यावर त्याच्या रडण्याला थांबवण्यासाठी अनेक पालक त्यांच्याजवळ फोन देतात ,त्यांच्या फोनमध्ये गेम्स टाकतात, युट्युब वर विविध व्हिडिओ लावून देतात आणि ते रमत आहेत उन्हात जात नाहीत या समाधानाने त्यांना सपोर्ट करतात. परंतु जसजसं त्या मोबाईलचा वापर चालू होतो तसा लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, आळस असे विकार निर्माण होतात आणि ते कार्यक्षमतेला गमावून बसण्याचा धाक निर्माण होतो. कदाचित जर आम्हालाही लहानपणीच मोबाईल फोन्स भेटले असते तर आम्ही आमच्या जीवनात शिक्षण अर्थकारण तसेच समाजकारण यामध्ये जास्तीत जास्त यश मिळवू शकलो नसतो. कारण मोबाईलचा मोह जर मोठ्या वयाच्या माणसांनाही आवरत नाही तर लहान मुलांनातरी काय म्हणायचं.
. परंतु मोबाईल चा लहान मुलांसाठी धोका आहे जरी हे खरे असले तरी पालकांच्या च जवळ त्याचा उपाय सुद्धा आहे. आपल्या पाल्याला त्याचा हट्ट पुरवायचा ही त्याच्या कानाखाली वाजवून त्याला त्या गोष्टीपासून दूर करायचं हे त्यांचं त्यांनीच ठरवायचं. मोबाईल एक निर्जीव यंत्र आहे त्याच्यामध्ये सकारात्मक जीव टाकण्याचं काम हे एका सकारात्मक वृत्तीच्या माणसाला च जमु शकतं.... मोबाईलचे खूप उपयोग आहेत. प्रामुख्याने व्यावसायिकांना उद्योजकांना विद्यार्थ्यांना शिक्षक जणांना तसेच तांत्रिक बाबिन विषयक सर्व लोकांना मोबाईल फोन्स अत्यावश्यक आहेत. आजचा जमाना डिजिटल होत आहे. पूर्वीच्या सारखे कागदपत्री काम आता कमी झाले आहे. आता ऑनलाइन काम केले जातात. परीक्षेचा फॉर्म असेल किंवा एमपीएससीची तयारी असेल सर्व काही मोबाईल फोनच्या स्क्रीनवर आपल्याला महत्त्वाचे प्रमाणात उपलब्ध होत आहे. बस त्या सर्व गोष्टींचा उपयोग करायचा अथवा नाही करायचा हे आपलं आपल्यालाच ठरवायचे आहे कारण मोबाईल फोन्स संगणक आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक साधने हे स्वयंचलित नाहीत त्यांना चालवण्याचं काम माणसालाच करावे लागते. आताचे वातावरण बघता मला असे वाटत आहे की विद्यार्थ्यांना मोबाईल फोनचे तसेच सर्व डिजिटल माध्यमांची योग्य उपयोगाची माहिती मिळवून देण्यासाठी त्यांच्यामध्ये तशी जाणीव निर्माण करण्यासाठी शालेय पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे ..तरच त्यांच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल....
निर्जीव वस्तूंना दोष देण्यापेक्षा आपणच आपल्या चिंतनातून योग्य-अयोग्य याचा ठाव लावला पाहिजे असं मला वाटतं.
. *गणेश शेळके*

Comments
Post a Comment