कशी ती...
#ती ....…..
कशी ती आली जीवनात माझ्या,
रंग भरले तिनं जगण्यात माझ्या,
खेळ खेळी केशांशी बेधुंद होऊन ,
अशी गेली अडकुनी मनात माझ्या...
नसेल ती सुंदर इतरांसाठी; पण ,
हुशारी तिची भावे मनास माझ्या,
गोड तिची वाणी ,खट्याळ तिची भाषा,
पाहुनी तिस झाली बंद माझी ही वाचा....
पण गुणगुणत गाणी तिच्यासाठी रोज ,
दिवसही जातो आजकाल गोड माझा ,
कसली जरी कटी तिनं मजसी न बोलण्याची ,
तरी मी धडपडत असतो एका झलकेस तिच्या,
नको मज तिचं प्रेम ,बस हवंय तेच ,
जे नसेल कुणासही भेटलेलं अद्याप ,
जे राहील फक्त जवळ माझ्या...
*(गणेश शेळके)
Comments
Post a Comment