दारूचा भक्त...
जवळ नाही पैसा म्हणून तो पिसाळून गेला,
उधार दारू घेऊन कर्जाचा डोंगर उभा केला,
आम्ही समजावून गेलो थकून त्याला,
पण त्याने डोंगराचा अजून पर्वत केला...
आईला देई ताण ,बायकोला देई शिव्या,
लोकांचा खाई मार अन सकाळी म्हणे मैने काय किया?
लहान चिमुकल्या लेकरांची न येई त्याला माया
लाडामुळेच हा मायबापाच्या ,माणूस गेला वाया...
कितीदा पडला खड्यात, कितीदा पडला नाल्यात,
पण बेशर्मासारख तरीसुद्धा हसे गालातल्या गालात...
व्यसनामुळं सगळं त्याचं आयुष्य झालं बरबाद,
अन ज्यादा ढोसून एका रात्री ,झाला तो आजाद...
गणेश शेळके.
Comments
Post a Comment