जाणीव आहे...


(M.com ला असतांना  हॉटेल वर कामाला होतो त्यावेळेस ची पोस्ट)
"तू एवढा शिकलेला असून हॉटेल मध्ये का बरं भांडी घासतो रे ?.... "असं खूप जण मला विचारतात.मी सगळ्यांनाच उत्तर नाही देऊ शकत पण आज व्यक्त करतो ....
       माझ्या आईनं हाडाचं पाणी करून आम्हा भावंडांना लहानाचं मोठं केलं .लोकांच्या शेतात अगदी काडी कचऱ्यापासून मोठे दगडं उचलण्यापर्यंत चे सर्व कामं ती अव्याहतपणे करते - कुणासाठी ?...फक्त आमच्यासाठी !...आमच्या शिक्षणासाठी .. आमची कोणतीही गरज असो ती पूर्ण करण्यासाठी ती राब राब राबून उसने पासने करून पैसे आणते..आमच्या आजारपणात आमच्यापेक्षा तिलाच जास्त तकलीफ होते...आम्ही मात्र तेव्हा खुशीत तिने आणलेल्या पैशाने गरज भागावायचो...आईनं जर माझ्यासाठी हीन समजली जाणारी खूप सारी कामं कोणतीही लाज न बाळगता केली तर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भांडी नाही घासू शकत?...मी का बरं लाज बाळगायची ?...... कामाला असतांना काही पोरं ओळखीची माणसं दिसल्यावर तिथून पळ काढतात...मी मात्र बिंदास कामं करतो .कारण माझ्यातली कामाची लाज आणि आळस कधीच मेलेला आहे...उलट आपल्याला स्वतः चा अभिमान वाटला पाहिजे की आपण कष्टापासून अंग चोरत नाही तर इज्जतीची भाकर खातो जी आळशी आणि संकोची माणसाला कधीच भेटू शकत नाही ...पैशावाल्याचे पोरं जर इस्टेटी च्या घमंडा ने आळस करू लागली तर आयुष्यात स्वतः च्या बळावर खडकू पण कमवू शकणार नाहीत.. ...माझ्या पात्रतेवर मला मस्त सावलीतलं काम भेटलं असतं, पण ते म्हणतात ना की ,कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लहान गोष्टीपासून होते आणि जेव्हा मला लहान समजली जाणारी कामं अनुभवता येतील ती जगता येतील ,तेव्हाच मला कष्टाचे महत्व आणि जीवनाचा संघर्ष कसा असतो ते कळेल..मोठी पोस्ट घेण्यासाठी मोठं मनही लागतं, हेच मन मिळावं म्हणून मी छोटी छोटी कामं करण्याचा निर्णय घेतला. आणि माझ्या निर्णयामुळं मला अजूनही पश्चताप करण्याची वेळ आली नाही ..।काम छोटं किंवा मोठं नसतं, काम ते कामच असतं. कामाची इज्जत करणं हीच ईश्वरपूजा !..
  आजपर्यंत खूप ठिकाणी कामं केली ,पण काम सोडताना कुणाशी वैर ठेवलं नाही.माझा सर्वात मोठा गुरू म्हणजेच माझी आई ! आयुष्याचे गणित तिनंच मला शिकवलं...
    जरुरी नाही की खूप शिकून मी मोठा साहेबच बनावं.मला माझ्या पासून तसली अपेक्षा नाही ..माझ्या कुटुंबाला पुरून उरेल एवढी संपत्ती कमवता येईल असं काम मिळवण्यासाठी च मी धडपड करत राहणार...आमचे साहेब म्हणतात - "केलेलं कष्ट आणि केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही !"  त्यांचं हे विधान मी कधीच खोटं ठरू देणार नाही ..ईश्वराच्या कृपेने कोणत्याही वाईट सवयी ला बळी न पडता जीवनाची पुढची वाटचाल मी सुरू केली आहे ..ही पोस्ट फक्त मलाच लागू होत नाही, तर माझ्यासारख्या सर्व तरुणांनाही लागू होते...मित्रांनो ,जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ,तुम्हाला स्वतः वर विश्वास असेल आणि उज्ज्वल भविष्य बनवण्यासाठी तुमच्यात तशी धमक असेल, तर तुम्हाला यशाची शिखरं गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही...


            GK ..

Comments

  1. एक नंबर रे भाई

    ReplyDelete
  2. Khup sundar.... kharch kontyahi gostit kami pna nsto apn ch janiv thevavi ki aplya karta aplya javalchya lokani ky sosal ahe

    ReplyDelete
  3. Khup sundar.... kharch kontyahi gostit kami pna nsto apn ch janiv thevavi ki aplya karta aplya javalchya lokani ky sosal ahe

    ReplyDelete
  4. Kharach Ganesh tuza to Prabhas mi javlun baghitlay tuzyat ti jidd aahe mala asha aahe ki tu ayushat khup successful hoshil bhava

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!