प्रवास आयुष्याचा...
प्रवास हा आयुष्याचा
कधी सुखाचा, कधी दुःखाचा
खडतर श्रमाचा, मोहणाऱ्या भ्रमाचा...
गोंधळाची ओंजळ, अनुभवांची अंघोळ,
रुजलेला स्वभाव,पडणारा प्रभाव...
पैशांची कमतरता, टंचाईचा गोता...
आयुष्य एक खेळ मनाचा,
एकटेपणाची जाणीव,
समाधानाची उणीव...
प्रतिष्ठेचा देखावा, आश्वासनांचा कांगावा..
आयुष्य अनमोल ,अद्वितीय, अद्भुत अन अनिवार्य...
GK SHELKE

Comments
Post a Comment