आज कळलं...


तरुण म्हणजे काय असतं ते आज कळलं ,
कसे भटकतात तरुण कशाकशाने ते आज कळलं...
आजूबाजूचं वातावरण पाहून डोकं ठिकाण्यावर आलं,
आजच्या तरुणाईला कीड लागलेलं पाहून मन गहिवरून गेलं...
आजचं प्रेम नसतं नुसतं प्रेम,
ते तर निव्वळ शरीराचं आकर्षण असतं,
इथे विचारांपेक्षा चेहरा सुंदर असणं
यालाच जास्त प्राधान्य असतं...
(अपवाद असतात म्हणा काही ,तुमच्या आमच्यासारखे)
आज कळलं की व्यसनामुळे घरची घरं बरबाद होतात,
आपण मात्र होणार नाही यातले हे आत्ता पक्क ठरलं...
अन तरुण म्हणजे काय असतं ते आज कळलं...
भटकत राहिलो अनेक वर्षे क्षणभंगुर गोष्टींपायी,
अभ्यासातून तरुणाईच्या,ते सर्व निरर्थक ठरलं...
तरुण म्हणजे कसा असावा ते आज कळलं...
       कवी :गणेश शेळके
               


Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!