हेही महत्वाचं...



एक दिवस मीपण म्हातारा होईन...मग आयुष्याच्या अशाच एका वळणावर मला सेवानिवृत्त व्हावे लागेल आणि मी असाच ह्या आजोबांसारखा गावच्या पारावर इतर वृद्धांना कंपनी देईन...मग त्यावेळी मला कसं वाटेल ?...माझ्या मनात कोणती विचार घोळत  राहतील..?...

     असा विचार आज माझ्या मनात आला...आपण रोज कुठं न कुठं टाइमपास करतो ,कुठं न कुठं हिंडतो.कुठं तरी  एखाद्या चावडिवर किंवा गावच्या पारावर अनेक वयोवृद्ध आजी आजोबांची गर्दी दिसते...पण आपण तिथं जाऊन बघतो का ?....  मी मात्र तसं वागायला सुरुवात केलीय...त्यांच्या मनात खूप सारे विचार असतात. खूप सारे कोडे असतात जे ती सोडवत बसलेले असतात...कधी एखादे आजोबा एकट्यात एका दुसऱ्या कोपऱ्यात दूर बसलेले दिसतात तेव्हा त्यांच्याशी बोलून बघा...

        आपल्याला खूप सारे मित्र असतात वेळ घालवण्यासाठी पण या म्हातारयाना कधी कधी कोणीच भेटत नाही...ते एकटेच बसलेले असतात...त्याना बघून कसतरी feel होतं...आपणही एक दिवस म्हातारे होणार ,तेव्हा असंच कधीतरी आपणही  पारावर किंवा चावडिवर बसु....म्हणून कुणी असे बसेल दिसल्यावर आपल्याजवळचा थोडा वेळ त्यांनाही द्यावा ,त्याना आपुलकीनें विचारपूस करावी,त्यांची मते घ्यावीत.. त्यांच्या सोबत घडलेल्या अनुभवांचा अनुभव घ्यावा..मग बघा किती भरभरून ते आपल्याला आशीर्वाद देतील.....

          गणेश काशिनाथ शेळके,
             शिरपूर

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!