सकारात्मक कविता...

अडचणी खूप आहेत म्हणून का उदास बसायचं?
उपाय सापडत नाही म्हणून का कुढत मरायचं?
ताण वाढत आहे म्हणून का दुःखी राहायचं?
अमुक जमत नाही म्हणून का कमजोर पडायचं?
संकटाना घाबरतो म्हणून का दूर पळायचं?
इतका सारा आनंद सोडून रडत का फिरायचं
 ?...
कोण म्हणतं नाही हो काही कारण हसण्यासाठी?
काम ,मित्र ,कुटुंब जिवलग सगळ्यांमध्ये च आनंदाला शोधायचं...
निराश होऊन किती रे दिवस नशिबाला कोसायचं ?...
स्वतः च्या चुकीचं खापर देवावर का फोडायचं?……
नाही होणार अडचणी कमी ,तरी हसत जगायचं,
नकारात्मकतेला संपवेल ते हसणं,म्हणून खुश राहायचं..…!
        
      GKSHELKE 
(१५/०६/२०१८)

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!