#हास्य...



चेहऱ्यावर हास्य ठेवणारी व्यक्ती जीवनात नेहमी अडचणींवर लवकर मात करते हे मी अनुभवावरून सांगतोय.हास्य म्हणजे सकारात्मकतेला आव्हान देणारी एक शक्ती असते.जेव्हा खूप साऱ्या अडचणी एकाच वेळेस येतात ,तेव्हा लोकं खचून जातात ,नशिबाला दोष देत बसतात. हे नशीब गीशिब काही नसतं, तो सगळा मनाचा खेळ असतो.ज्याला वाटतं की आजचा दिवस खूप खराब जाणार, त्याचा दिवस नक्कीच खराब जातो.आणि जो नेहमी हसत हसत अडचणींचे स्वागत करतो आणि तरी म्हणतो की आजचा दिवस माझ्या लाईफ चा सर्वात डॅशिंग दिवस होता, त्याचे पुढचे सगळे दिवस हे आपोआप चांगले जातात...प्रॉब्लेम हा नाही की आपल्या जीवनात अडचणी येतात, तर प्रॉब्लेम हा आहे की आपण अडचणीशी लढण्याऐवजी सगळा वेळ रडण्या पडण्यात घालतो.उपाय समोरच असतो पण आपण नकारात्मकते मध्ये असे गुंफलेलो असतो, की आपल्याला तो दिसतच नाही...डॉक्टर जेव्हा रुग्णाला तपासतात ,तेव्हा त्यांच्या चेहर्याकडे नक्की बघजा, जास्तीत जास्त डॉक्टर हे चेहऱ्यावर पॉझिटिव्ह स्माईल ठेऊनच पेशंट ची काळजी घेत असतात.गोळ्या औषधं कितीही भारी असोत पण रुग्णामध्ये जर जगण्याची उमीदच जागी नसेल तर तो बरा होणार नाही. याउलट जेव्हा डॉक्टर प्रेमानं सांगतो की तुम्ही ह्या गोळ्या घेतल्यावर दोन दिवसांच्या आत अगदी ठणठणीत व्हाल, तेव्हा त्यांच्या शब्दाचा परिणाम इतका पॉझिटिव्ह होतो की रुग्ण दोन दिवसातच ठणठणीत होतो.गोळ्या साध्या पण मनाची असाधारण ताकद त्यांना आणखी प्रभावी बनवते...यालाच म्हणतात विश्वासाची सकारात्मक ताकद..!
     आपल्या मेंदूचा एक विशेष आहे- जसा आपण विचार करू ,तशीच कृती तो आपल्या कडून करवून घेतो...मरणाऱ्या पेशंट ने जर म्हटलं की मी मरतो आता ,तर ते नक्कीच गजकेल...आपली माईंड पॉवर इतकी भारी असते की आपण जे विचार अगदी मनापासून मनात दिवसभर घोळत राहतो ,त्याचा पोसिटीव्ह रिस्पॉन्स आटोमॅटिक कृतीतून घडतो..चेहऱ्यावर नेहमी थोडं हास्य ठेवत जा ,तुम्हाला अडचणींचा त्रास जास्त जाणवणार नाही.ज्यावेळी आपण खचून जातो तेव्हा आपली विवेकबुद्धी आणि निर्णयक्षमता दोनीही काम करणं जवळपास बंद करतात.जेंव्हा संकटात खचून न जाता सगळं ठीक  होईल असा स्वतः च्या मनाला दिलासा द्याल ,तेव्हा नियती आपोआप आपल्याला त्या संकटापासून दूर नेते. अवघड कामाला "अरे बापरे!" म्हणण्याऐवजी मी "अरे वा!.." असे म्हणतो, आणि माझं प्रत्येक अवघड काम मी सहज पूर्ण करतो. कुठल्याही वाईट परिस्थिती समोर दोन पर्याय असतात- एक म्हणजे अडचणीला घाबरून रडत बसने आणि दुसरं म्हणजे अडचणींना  हसत हसत सामोरे जाणे... "अरे या रे या अडचणींनो दाखवा तुमच्यात किती आहे दम!..." असं मनात म्हणून त्या अडचणींना चिडवत राहायचं. मग बघा त्याच तुम्हाला घाबरून आपोआप पळून जातील...परिस्थिती ला सावरायला वेळ जरूर लागतो.आज आपल्याला गरज आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील.. तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांसोबतच स्वतः वरही तुमची श्रद्धा असेल तर त्या बळाने स्वतः च्या पायावर उभं राहता येईल.मनुष्याच्या शक्तीने ,उत्साहाच्या बळाने व श्रद्धेच्या सामर्थ्याने हे सर्व जग बनलेलं आहे...म्हणून नेहमी चेहऱ्यावर एक हास्य ठेवा आणि येणाऱ्या आव्हानांना हसत तोंड देत रहा...


   गणेश शेळके

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!