आपल्याला नाय पटत...

‌काही माणसं ना इतके निगेटिव्ह असतात की त्यांना काहीही चांगलं जरी दिसलं तरी त्यात काही न काही दोष शोधतात...एखादा व्यक्ती काही व्यक्त करत असला की त्यांना खटकतं..स्वतः च्या आयुष्यात छान चालू असल्यावर दुसऱ्याच्या आयुष्यात होणाऱ्या गडबडीचं बघतात...सुदैवाने आपल्याला असली नकारात्मक माणसं भेटली नाहीत याचा आनंद आहे...ज्याची अडचण त्यालाच माहीत असते.त्यामुळं काहीही विचार न करता उगाच त्याच्या कामात नाक घालणं योग्य नसतं..आपल्याकडे असली प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आहे.या प्रवृत्तीमुळेच समाजाची प्रगती खुंटते... कोणाला वाटतं की आपण नेहमी अडचणीतच राहावं?...काही गोष्टी असतात ज्यामुळे त्यांना पुढची वाटचाल थोडीशी अवघड असते..लोकांचं चालतं की लवकर नोकरीला लागा. त्यांना काय माहीत इकडं काय अडचणी आहेत ते...बोलायला काय जाते लोकांना...ज्यांच्याकडून आपल्याला मानसिक आधाराची अपेक्षा असते तेच माणसं  कधी कधी आपल्यावर नकारात्मक टीका करू लागतात...लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊन काही माणसं स्वतः च्या च नातेवाइकांना वाईटात काढू लागतात.. हे सगळं त्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे घडते...काही माणसं जास्त काही बोलत नाहीत पण काही न काही चांगली मदत करून जातात..तर काही माणसं नुसती बोलतच राहतात...लोकांचं काय चालू आहे यापेक्षा आपलं कसं सुरू आहे हे बघणं जास्त महत्वाचं नाही का?...


Gkshelke

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!