अपंग...

मंदिराच्या पायथ्याशी बसलेल्या अपंग , निसाहाय गरिब म्हातारीला क्रॉस करूँन आम्ही दानपेट्यात पैसे टाकतो, 
 म्हणूनच आमचा देव आम्हाला सर्वकाही देतो...
माझ्या मनात एकच गोंधळ , 
कशी काय भरेल देव स्वार्थी माणसाची ओंजळ ? ...
मंदिरात जाऊन फोडतो आम्ही नारळ , 
कशी काय वाटत नाही गरीबांची तळमळ ? ...
पुन्हा विचारतो एक प्रश्न देवा तुला...
तरसू राहिले गरीब दोन घासासाठि , 
अन इकडं मात्र आम्ही भजत असतो पोथी ...
कसे काय रे देवा तुझे हे मुलं इतके स्वार्थी,
दिवस होता अज्ञानात त्यांच्या होतच आहे  भरती...
मुर्त्या महाग देवा तुझ्या घडवून केला जातोय बाजार,
अन गरिबांच्या शेतमालाला झालाय जणू आजार.. 
कशी रे देवा भक्ती यांची समजत नाही मला,
गँगस्टर सुद्धा पापं करून पूजत असतात तुला...

त्या म्हाताऱ्याबरोबर लोकांची मानसीकता पण झाली का रे अपंग ? ........

  Gkshelke..


Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!