अवघड आहेत वाटा...


अवघड आहेत वाटा अवघड आहेत मार्ग,
प्रयत्नांची करून पराकाष्ठा घडवुयात एक स्वर्ग;

वाईट मार्ग पकडू नका ईमानास या झटकून,
बेजोड़ अशा सु-तत्वांना रहात चला चिटकुन..

खास असावी आशा जीवाला तमा असो  उद्याची,
कास धरावी सुधारण्याची   परिस्थिती ही सध्याची..

कधी न जावे दुखवुनी कुणाहि यशाच्या ह्या वाटेवर,
मनांत जागा बनवत जावी तुडवत रस्ते  खडतर...

संघर्षांमधुनी  घेत जावी  योग्य अशी एक शिकवण ;
चला निघूया करण्या आपुल्या मायभूमीची राखण....

      {कवि : GK....SHELKE}

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!